Download App

Loksabha Election : नो धंगेकर नो मोरे पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात वेगळचं नाव

Loksabha Election : देशात आगामी लोकसभा निवडणूका ( Loksabha Election ) जाहीर झाल्यानंतर आता सर्वच पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. अशातच आता काँग्रेस राज्यात 18 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये पुण्यातून रविंद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून देण्यात आली आहे. तसेच या जागेसाठी नुकतेच मनसेला सोडलेल्या वसंत मोरे यांचं देखील नाव चर्चेत आहे. मात्र पुण्यातील कार्यकर्त्यांच्या मनात मात्र वेगळंच नाव आहे. तसेच निष्ठावंतांना संधी देण्यात यावी यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात वेगळचं नाव…

पुणे लोकसभा निवडणुकीसाठी पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या पर्वती विधानसभा मतदारसंघांची पूर्वनियोजित बैठक झाली. माजी उपमहापौर श्री. आबा बागुल यांनी या पूर्वनियोजित बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी निष्ठावंतांना संधी दिली पाहिजे. अन्यथा त्याचे विपरीत पडसाद सहाही विधानसभा मतदार संघात निश्चित उमटतील. अशी आक्रमक भूमिका घेत पर्वती विधानसभा मतदार संघातील सर्व ब्लॉक अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करताना पक्ष श्रेष्ठींनी तत्काळ दखल घ्यावी. अन्यथा तटस्थ राहण्याचा इशारा यावेळी पक्षाच्या निरीक्षक व अन्य पदाधिकाऱ्यांना दिला.

पश्चिम महाराष्ट्रात ‘मशाल’ पेटण्यापूर्वीच विझणार; पाटील, कदम अन् पवारांकडून ‘ठाकरेंचा’ करेक्ट कार्यक्रम

यावेळी लोकसभा निवडणुकीत जर निष्ठावंतांना डावलले जात असेल तर कार्य कसे करायचे असा थेट सवाल पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निरीक्षकांना विचारला. ज्यांनी आजवर पक्षाशी प्रामाणिकपणे राहून काम केले. त्यांनाच बाजूला सारण्याचे राजकारण होत असेल तर आता पक्षाच्या श्रेष्ठींनी निष्ठावंत म्हणजे काय ? याची व्याख्या जाहीररीत्या सांगावी. असे आव्हानही यावेळी भावना व्यक्त करताना कार्यकर्त्यांनी दिले.

‘प्रचाराच नाही तर विजयी सभेलाही येणार’; उद्धव ठाकरेंचं शाहू महाराजांना वचन

याप्रसंगी माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले की, गेल्या चाळीस वर्षांपासून मी समाजकारण आणि राजकारणात कार्यरत आहे. काँग्रेसचा निष्ठावंत आहे. सलग ३० वर्षे निवडून येत आहे आणि विकासाला सदैव प्राधान्य दिले आहे. पक्षाचे ध्येय धोरणे तळागाळात रुजवली आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पक्षात मरगळ होती. त्यामुळे जाहीर सभा घ्या आणि पुणेकरांचा कौल घेवून उमेदवार ठरवा.

हे पत्र दिले मात्र त्याला लेटर बॉम्बचे स्वरूप दिले मात्र काँग्रेस यंदाच्या निवडणुकीत आहे. हे वातावरण निर्माण झाले. ते पत्र जर लेटर बॉम्ब होते. मग आता पुढे पहा काय होते. पुढील भूमिका ही कार्यकर्ते, समर्थक, मतदारांशी बोलून लवकरच ठरवली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच आताचे जे स्थानिक नेते आहेत.त्यांना पूर्वी कुणी थारा देत नव्हते. अशा नेत्यांची नावे विकासकामांच्या कोनशिलेवर माझ्याच आग्रहामुळे आयुष्यभर कोरली गेली. याची आठवणही आबा बागुल यांनी पक्षांतर्गत राजकारण करणाऱ्या स्थानिक नेत्यांना यावेळी करून दिली.

follow us