विद्यार्थ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे; राहुल गांधींचा गांधी स्मृतीकडे मोर्चा; विरोधी पक्षातील अनेक नेते सहभागी

Rahul Gandhi : विद्यार्थ्यांवर होत असलेल्या हिंसाचाराच्या आम्ही विरोधात आहोत. आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.

  • Written By: Published:
Rahul Gandhi Congress

Rahul Gandhi leads INDIA bloc MPs’ march at Delhi’s Gandhi Smriti amid CJP protest : शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टी (CJP) व विद्यार्थ्यांनी जंतर-मंतरवर आंदोलन सुरूच ठेवले आहेत. आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाने गांधी स्मृतीकडे मोर्चा काढला आहे. या मोर्चात विरोधी पक्षातील नेतेही सहभागी झाले आहेत. त्यामुळे दिल्लीतील वातावरण पुन्हा तापले आहे.


इंडिया आघाडीच्या खासदारांना रोखले

काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांसह इंडिया गेटवर जाण्याचा प्रयत्न केला केला होता. त्यांना पोलिसांनी रोखले आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय. देशभरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षातील सर्व खासदारांनीही विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरावे, असे आम्हाला वाटले. आम्ही इंडिया गेटला जाणार होतो, पण आम्हाला परवानगी नाकारण्यात आली.

पुन्हा दिसलास तर खिशात 50 ग्रॅम पावडर टाकेन; धमकी देणाऱ्या पोलिसाला गृह विभागाचा दणका..

त्यानंतर आम्ही 30 जानेवारी मार्गावरील गांधी स्मृती येथे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रशासनाने आमच्या मार्गात बस उभी केली आणि चालकही बस सोडून निघून गेला. त्यामुळे आम्ही पुढे जाऊ शकलो नाही, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. विद्यार्थ्यांवर होत असलेल्या हिंसाचाराच्या आम्ही विरोधात आहोत. आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे राहुल गांधी म्हणाले.


संपूर्ण विरोधी पक्ष त्यांच्या पाठीशी उभा आहे: राहुल गांधी

‘इंडिया’ आघाडीचे खासदार आणि नेते शांततापूर्ण पद्धतीने ३० जानेवारी मार्गावरील गांधी स्मृतीकडे जात आहेत, असे राहुल गांधी यांनी एक्स पोस्टवर म्हटले आहे. नीट (NEET) पेपरफुटीनंतर आत्महत्या करण्यास भाग पडलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि न्याय व उत्तरदायित्वाची शांततापूर्ण मागणी करताना मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आम्ही गांधी स्मृती येथे जात आहोत. भारतातील विद्यार्थी एकटे नाहीत. संपूर्ण विरोधी पक्ष त्यांच्या पाठीशी उभा आहे, असे राहुल गांधी यांनी एक्स पोस्टवर म्हणाले आहे.

NEET-UG 2024 : नीट पेपर लिक प्रकरणी संजीव मुखियाला क्लिनचीट…सीबीआयला कोणताही पुरावा मिळाला नाही


राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवला

राहुल गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर दिल्ली पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला होता.काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राज्यसभा सदस्य प्रमोद तिवारी, आरजेडीच्या खासदार मीसा भारती यांच्यासह अनेक विरोधी पक्षांचे नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचले.

follow us