Download App

Pune News : पोलिसांचं यश! लोणी काळभोर येथील टँकर चालकांचा संप टळला

Pune News : केंद्र सरकारकडून हिट अँड रन कायद्याच्या सुधारणेविरोधात (Hit and Run) देशात ट्रक आणि डंपर चालकांनी मोठं आंदोलन सुरू केलं आहे. इंधनाची वाहतूक ठप्प झाल्याने पेट्रोल पंप कोरडे ठाक पडण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यात पुन्हा अफवाही पसरल्या जात असल्याने पंपांवर वाहनांच्या तुफान गर्दी झाली आहे. हा कायदा चुकीचा असून सरकारने मागे घ्यावा यासाठी ट्रकचालकांनी चक्का जाम आंदोलन (Truck Drivers Protest) सुरू केले आहे. अशा परिस्थितीत काही ठिकाणी संप मागे घेतल्याच्याही बातम्या येत आहेत. विदर्भ आणि कोल्हापुरमधील ट्रकचालकांनी संप मागे घेतला आहे. तसेच पुण्याजवळील (Pune News) लोणी काळभोर येथील हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन कंपनीच्या टँकर चालकांनी कालपासून तीन दिवसांचा संप पुकारला होता. मात्र पोलिसांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर हा संप टळला आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांच चव्हाण यांनी पुढाकार घेतला.

चालकांचा संप पण पेट्रोल पंप खुलेच राहणार ! टँकरला पोलीस संरक्षण

मोटार वाहन नियमात बदल करण्यात आल्याने संतप्त ट्रक चालकांनी नवी मुंबईत आंदोलन केले. या आंदोलनाला काल हिंसक वळण लागले होते. या आंदोलनादरम्यान, पोलिस-आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नवीन मोटार वाहन कायदानुसार अपघातास जबाबदार ट्रकचालकास सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकाराला जाणार आहे. याच कायद्याला विरोध म्हणून कालपासून महाराष्ट्रासह देशभरातील सर्वच ट्रकचालक संपावर गेले आहेत. ट्रकचालकांचा हा संप तीन दिवसांचा आहे. संपाचा आजचा दुसरा दिवस आहे.

पेट्रोल पुरवठा करणाऱ्या इंडियन ऑइल, एचपीसीएल आणिब बीबीसीएल या तिन्ही कंपन्यांच्या ट्रक आणि टँकर चालकांनी ही संप पुकारला आहे. या संपाला लोणी काळभोर येथील ट्रकचालकांनीही समर्थन दिले होते. येथील ट्रकचालकही संपाच्या पवित्र्यात होते. संपाची कुणकुण पोलिसांनाही लागली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण स्वतः एचपीसीएल कंपनीत पोहोचले. यानंतर त्यांनी ट्रकचालकांशी चर्चा केली. कायद्याची अंमलबजावणी अजून सुरू झालेली नाही. तसेच हा कायदा सगळ्याच ट्रकचालकांसाठी आहे. त्यामुळे संप करून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरू नका, असेही सांगितले. त्यानंतर चालकांनीही प्रतिसाद देत संप मागे घेत असल्याचे स्पष्ट केले. यानंतर पंपावर इंधन पुरवठा सुरळीत झाला.

ट्रक चालकांच्या संपाचा परिणाम; पेट्रोलचा टॅंकर येणार नसल्याच्या भीतीने पंपावर तोबा गर्दी

 

follow us

वेब स्टोरीज