लव्ह जिहादविरोधात पावसाळी अधिवेशनात कडक कायदा येणार असल्याचं भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठणकावूनच सांगितलं आहे. दरम्यान, पुण्यात आज लव्ह जिहादविरोधात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आमदार नितेश राणे सहभागी झाले होते.
Akshay Bhalerao Murder Case : आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून दलित युवकावर खंजरने वार करुन हत्या…
पुण्यातील घोरपडी गाव येथे घडलेल्या लव्ह जिहादबाबत आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी नितेश राणे बोलत होते. या मोर्चात अनेक हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाल्या होत्या. यावेळी नितेश राणे यांनी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेतली आहे.
खासदार अमोल कोल्हेंचे पीए असल्याची बतावणी करून पोलिसांना गंडवलं; गुन्हा दाखल
यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले, लव्ह जिहादबाबत कायदा हा खिश्यातून चिठ्ठी काढण्याइतकं सोपं नाही. कायद्यासाठी अभ्यास करावा लागतो. अनेक राज्यात लव्ह जिहाद विरोधात कायदा आहे. त्याचा अभ्यास केला जात आहे. गेल्या अधिवेशनात याबाबत विचार झाला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
‘डोळा लागला, आवाज ऐकून उठलो, पाहतो तर प्रेतांचा खच अन् करुण किंकाळ्या’; प्रवाशाने सांगितली आपबीती
तसेच प्राथमिक माहिती सादर देखील करण्यात आली आहे. कदाचित या पावसाळी अधिवेशनात देशातील सर्वात कडक आणि प्रभावशाली धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्रात येईल, तशी आमची तयारी असल्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते नितेश राणे यांनी ठणकावून सांगितलं आहे.
“आज जे अनुभवलं ते विलक्षण” : राज यांची स्तुतीसुमने; फडणवीस-ठाकरे सूर पुन्हा जुळले?
यावेळी मोर्चात असंख्य हिंदु बांधवांनी हजेरी लावली होती. विशेषत: महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून लव्ह जिहादचा कडाडून विरोध केला आहे. यावेळी आंदोलकांनी मोर्चामध्ये गळ्यात भगवा पंचा आणि डोक्यात भगवी टोपी घालत ‘जय श्रीराम, जागो हिंदु जागो’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
रायगडावर शिवराज्याभिषेक दिनासाठी तुफान गर्दी; दिग्गज नेते उपस्थित
याप्रसंगी भाजपचे आमदार नितेश राणे यांनीदेखील भगवा पंचा आणि भगवी टोपी परिधान करीत जोरदार घोषणा देऊन विरोध दर्शवला आहे. मोर्चाच्यादरम्यान, आमदार नितेश राणे यांनी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेतली आहे.
दरम्यान, काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांत लव्ह जिहादविरोधात हिंदु समाजाकडून आक्रमक भूमिका घेण्यात येत असल्याचं दिसून येत आहे.