रायगडावर शिवराज्याभिषेक दिनासाठी तुफान गर्दी; दिग्गज नेते उपस्थित

रायगडावर शिवराज्याभिषेक दिनासाठी तुफान गर्दी; दिग्गज नेते उपस्थित

350 Shivrajyabhishek Din :  छत्रपती शिवाजी महाराजांचा आज साडेतीनशे वा राज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा होत आहे. स्वराज्याची स्थापना करण्याचे ध्येय घेऊन वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी हिंदवी साम्राज्याची शपथ घेतली होती.  आज त्यांच्या ३५० व्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने राज्यभर मोठा जल्लोष पाहायला मिळतो आहे.

तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने रायगडावर शिवभक्त मोठ्या प्रमाणावर दाखल झालेले आहेत. जागेच्या मर्यादामुळे काहींना अद्याप गडावर जाऊ दिलेले नसले तरीसुद्धा शिवप्रेमींमध्ये उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज नेते देखील रायगडावर दाखल झालेले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सहपरिवार या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील रायगडावर दाखल झालेले असून छत्रपती उदयनराजे देखील रायगडावर आलेले आहेत.

मोठी बातमी : विठू नामाचा गजर गगनात निनादणार; चोख नियोजनाबरोबर टोल माफीचे निर्देश

यासह पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सुनील तटकरे, राम शिंदे, मंत्री उदय सामंत, दादा भूसे आदी नेते मंडळी देखील या सोहळ्यासाठी रायगडावर दाखल झालेले आहेत. या सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर सर्वत्र फुलांची आरास करण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला फुलांनी सजवण्यात आलेले आहे. तसेच महाराजांच्या बसलेल्या स्थितीतील चांदीच्या पुतळ्याच्या पालखीसाठी पालखीला देखील सजवण्यात आलेले आहे. एकंदरीतच आजच्या दिवशी रायगडावर चैतन्य अवतरल्याचे दिसून येते आहे.

आयपीएल डॉट बॉल, बीसीसीआय आता किती झाडं लावणार?

“शिवछत्रपतींचा राज्याभिषेक महाराष्ट्रच नाही, देशच नाही तर अवघ्या जगासाठी आनंदाचा दिवस आहे. छत्रपती शिवरायांसमोर नतमस्तक होण्यासाठी इथे सगळे जमले आहेत. महाराष्ट्रातले अनेक दिग्गज नेते इथे येत आहेत. आनंद वाटतोय. राज्य सरकारने यासाठी सर्व काळजी घेतली आहे”, अशी प्रतिक्रिया भाजप नेते राम शिंदेंनी दिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube