पुणे : महादेव बेटिंग ऑनलाईन अॅपचे (Mahadev App) धागेदोरे पुणे जिल्ह्यातील नारायणगावपर्यंत येऊन पोहोचले असल्याचे समोर आले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी छापेमारीत 70 ते 80 जणांना ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे. या अॅपचे काम नारायणगावमधून सुरू होते अशी माहिती मिळाली होती. त्यानंतर पुणे (Pune) ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापेमारी केली यात 70 ते 80 जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणात याआधी भारतासह परदेशातही छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर आता याचे काम पुण्यातील नारायणगाव येथून सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापेमारी करत 80 जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात बॉलिवूडमधील काही दिग्गज कलाकारांचीही ईडीने चौकशी केली आहे. (Pune Ruler Police Raid In Narayangaon In Mahadev Batting App Case )
PM मोदींना छत्रपती शिवरायांचा जिरेटोप, टीका होताच पटेल नरमले; म्हणाले, यापुढे काळजी घेऊ..
महादेव बुक अॅप हा सट्टेबाजीचा ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. या अॅपवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. मात्र, अन्य देशांत हे अॅप सुरू आहे. छत्तीसगडचा सौरव चंद्राकर आणि त्याचा सहकारी रवी उप्पल दुबईतून हे अॅप चालवत होते. सौरव आणि रवी उप्पल या दोघांकडेही सहा हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम असण्याची शक्यता आहे.
ज्यूस सेंटर चालवणारा बनला अट्टल सट्टेबाज
सौरव चंद्राकर हा छत्तीसगडची राजधानी रायपूर शहरात एक ज्यूस सेंटर चालवत होता. नंतर तो सट्टेबाजी करू लागला. सौरव आणि रवी या दोघांकडेही सहा हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या अॅपसाठी दाऊद गँगने दोघांना मदत केल्याचेही समोर आले आहे. ईडीच्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. महादेव ऑनलाइन बुक पोकर, कार्ड गेम, चान्स गेम, क्रिकेट, टेनिस, फुटबॉल यांच्या लाइव्ह खेळांत सट्टेबाजी करण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत होते. आता या प्रकरणात रवी उप्पलला दुबई पोलिसांनी अटक केली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
महादेव ऑनलाइन गेमिंग ॲपमध्ये मनी लाँड्रिंगबद्दल (Money laundering) एका भव्य लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडिया आला होता. हा व्हिडीओ मुख्य आरोपी सौरभ चंद्राकरच्या लग्नसोहळ्यामधील होता. मुख्य आरोपी हा ॲपच्या संस्थापकांपैकी असल्याचे देखील समोर आले आहे. सौरभ चंद्रकरच्या लग्नसोहळ्याला अनेक कलाकार उपस्थित होते. या लग्नसोहळ्याचा व्हिडीओ आणि कलाकारांची यादी आता समोर आली होती. ज्यात टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली यांची नावे देखील समोर आल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. या प्रकरणी संबंधित सेलिब्रिटींच्या चाहत्यांना देखील मोठी धक्का बसला आहे. महादेव ऑनलाईन गेमिंग ॲपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये ईडीने गेल्या काही दिवसांत मुंबईसह राज्यातील अनेक वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती.