Download App

पंढरपूरला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; भीषण अपघातात पाच ठार, ४० जखमी

आषाढी एकादशीनिमित्त डोंबिवली परिसरातून पंढरपूरकडे निघालेल्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात झाला.

Bus Accident at Mumbai Pune Express Way : राज्यात रस्ते अपघातांत वाढ झाली आहे. भरधाव (Bus Accident) वेगातील वाहनांकडून वाहतुकीचे नियम पाळले जात नसल्यानेच बहुतांश अपघात होत आहेत. या अपघातात अनेक निरपराध लोकांचा मृत्यू होत आहे. आताही असाच एक भीषण अपघात घडला आहे. आषाढी एकादशीनिमित्त डोंबिवली परिसरातून पंढरपूरकडे (Pandharpur) निघालेल्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर (Mumbai Pune Express Way) भीषण अपघात झाला. सोमवारी रात्री उशीरा एक ट्रॅक्टर आणि बसची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात बसमधील 3 भाविक आणि ट्रॅक्टरमधील दोघे अशा एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर 40 जखमी भाविकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आयशर ट्रक आणि मारुती ब्रेझा कारचा मोठा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू, दोन जखमी

डोंबिवलीतील तीन ते चार गावांतून बस पंढरपूरकडे निघाल्या होत्या. यातील एका बसच्या पुढे एक ट्रॅक्टर चाललेला होता. रात्रीच्या वेळी अंधारात बस आणि ट्रॅक्टरची जोरात धडक झाली. ही धडक इतकी जोरात होती की बस 20 फूट खाली घसरली. यात बसमधील बरेचसे प्रवासी जखमी झाले. तीन जण जागीच ठार झाले तर ट्रॅक्टरमधील दोघे मृत्यू पावले. बसमधील आणखी सात प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या दवाखान्यात उपचार सुरू आहेत. तसेच 42 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात रात्री एक वाजण्याच्या सुमारास झाला. 54 पैकी 42 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर तिघा जणांना सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे एक्सप्रेस वे वर ट्रॅक्टरला बंदी आहे. तरी देखील ट्रॅक्टर येथे आला होता. त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, रस्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी या उपाययोजनांची गरज आहे. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे. अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी या महामार्गावर अपघात सातत्याने होत आहेत. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे.

follow us