Download App

Pune Porsche Accident : “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”; फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं

पुण्यातील कार अपघात प्रकरणाचं राजकारण केलं जात आहे जे योग्य नाही अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Pune Porsche Accident : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघाताची देशभरात चर्चा (Pune Porsche Accident) सुरू आहे. या अपघातात अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करून त्याला बालसुधार गृहात पाठवलं आहे. या कारवाईनंतरही विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठली आहे. त्यांच्या या टीकेवर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचं राजकारण केलं जात आहे जे योग्य नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Pune Accident : अजितदादा पुण्याचे की बिल्डरचे पालकमंत्री? दादा गप्प का? राऊतांचे टोचणारे सवाल

देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना पुणे अपघातावर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेबाबत विचारण्यात आले. त्यावर फडणवीस म्हणाले, याचा राजकीयकरण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. जी काही कारवाई पोलिसांनी केली पाहिजे ती सर्व कारवाई केली आहे. तसेच जुवेनाईल जस्टिस कोर्टाने जो निर्णय दिला होता त्याच्या विरोधात वरच्या कोर्टात जाऊन तो निर्णय बदलून घेतला आहे. पहिल्यांदा पबचे मालक आणि मुलाचे वडील यांना अटक झाली आहे. या प्रकरणात कठोर कारवाई झाली आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं योग्य नाही.

डोंबिवली एमआयडीसीत कंपनीतील स्फोटाप्रकरणी भाष्य करत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. या घटनेवरून ठाकरे गटाने जोरदार टीका केली होती. फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंनी फाईलवर केलेला एक तरी निर्णय दाखवा. त्यांनी आजपर्यंत काहीच केलं नाही. कुठले उद्योग एका दिवसात हलवले जात नाही. उद्योग तिथून हलवले गेले पाहिजे यासंदर्भात बऱ्याच वर्षांपासून चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात काहीही केले नाही. त्यांची एक तरी फाईल दाखवा ज्यात त्यांनी काही निर्णय घेतला आहे. मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या सर्व उद्योगांना पर्यायी जागा दिली पाहिजे. सरकार त्यासाठी पुढाकार घेईल, असे फडणवीस म्हणाले.

फडणवीसांनी उल्लेख केलेला राजकीय दबाव नेमका कुणाचा? पुणे अपघातप्रकरणी सुप्रिया सुळेंचा सवाल

follow us