Download App

शरद पवारांचा शब्द, उद्धव ठाकरेही पक्के; कलाटेंनी नेमकं काय सांगितलं?

पवार साहेबांनी मला एकच सांगितलं की राहुल वातावरण खूप चांगलं आहे. तू आमदार झाला की आपल्याला महापालिका ताब्यात घ्यायची.

Rahul Kalate : ‘पवार साहेबांनी मला एकच सांगितलं की राहुल वातावरण खूप चांगलं आहे. तू आमदार झाला की आपल्याला महापालिका ताब्यात घ्यायची. तरुण आणि चांगली काम करणारी मुलं आली पाहिजेत. महापालिका जर आपल्याकडे आली तर हे शहर आपल्याला पुन्हा बांधता येईल’, शरद पवार यांची (Sharad Pawar) भेट घेतल्यानंतर त्यांनी हा मोलाचा सल्ला मला दिला असे चिंचवड मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांनी (Rahul Kalate) सांगितले. चिंचवड मतदारसंघात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने राहुल कलाटे यांना तिकीट दिलं आहे. मतदारसंघात त्यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. लेट्सअप मराठीच्या विशेष कार्यक्रमात राहुल कलाटे यांनी मतदारसंघाचा लेखाजोखा मांडला.

शरद पवारांचा आशीर्वाद, गेमचेंजर मुद्दे हातात; कलाटेंना चिंचवडमध्ये दिसतेय परिवर्तनाची लाट..

‘पिंपरी चिंचवड महापालिकेने सीबीएसईच्या निकषांनुसार पहिली शाळा वाकडला बांधण्यात आली. ही शाळा आज पूर्णत्वास येत आहे. तीन टप्प्यात मी ती केली. पुढील जून महिन्यात ही शाळा सुरू होईल. सातवीपासूनच आयटीआय मुलांना बंधनकारक करा अशीही मागणी मी करत आहे. याद्वारे मुलांना शिक्षणाबरोबरच व्यावसायिक कौशल्य देखील आत्मसात करता येईल. दहावी होईपर्यंत त्याच्या हातात एक वेगळं स्किल असेल जेणेकरुन तो त्याचं पुढील शिक्षण करू शकेल. मी जर आमदार झालो तर रेल्वेकडे न करता मी ते महापालिका हद्दीतील गांधीनगर येथे नेईल.’

उद्धव ठाकरे आणि तुमचे संबंध कसे राहिले आहेत, असे विचारले असता कलाटे म्हणाले, ‘उद्धव साहेबांचे आणि माझे संबंध नेहमीच चांगले राहिले. उद्धव ठाकरेंची एक खुबी आहे की एकदा बोलल्यानंतर ते त्या शब्दावर ठाम राहतात. हा अनुभव मला पोटनिवडणुकीच्या वेळेला आला आहे. स्थानिक शिवसेनेचे कार्यकर्ते देखील माझ्याबरोबर आहेत.’

लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला बळ मिळाल्याचं सांगितलं जात आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं? असा प्रश्न विचारला असता कलाटे म्हणाले, ‘मला मतदारसंघात फिरताना तर तसं काही दिसत नाही. मतदारसंघातील महिलांसाठी मी अनेक उपक्रम राबवले आहेत. दरवर्षी रांगोळी स्पर्धा भरवल्या जातात. दरवर्षी पिंपरी चिंचवड वुमन्स लीग या महिला क्रिकेट स्पर्धा भरवल्या जातात. या व्यतिरिक्त अन्य उपक्रम सातत्याने आयोजित केले जातात. त्यामुळे मतदारसंघात महायुतीच्या लाडकी बहीण योजनेचा परिणाम जाणवणार नाही.’

Rahul Kalate यांच्यासाठी गुड न्यूज.. प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीला झटका

यंदा या मतदारसंघात परिवर्तन होईल असं वाटतं का? या प्रश्नावर उत्तर देताना कलाटे म्हणाले, ‘परिवर्तन होणार हे आता पावलोपावली जाणवत आहे. या मतदारसंघातल्या जवळपास ७५ टक्के भागाचे खूप वर्षांपूर्वी पवार साहेब स्वतः खासदार होते. या मतदारसंघातील चिंचवड, रावेत, काळेवाडी, सौदागर, पिंपळे गुरव यातील साठ टक्के लोकसंख्येचे शरद पवार (Sharad Pawar) खासदार होते. त्यामुळे या मतदारसंघातील लोकांचा पवार साहेबांप्रति असलेला जिव्हाळा मला पदोपदी जाणवतोय. पवार साहेबांच्या संकल्पनेतूनच हिंजवडी आयटी पार्क उदयास आलाय.’

follow us