Download App

कोल्हापूर टस्कर्समध्ये श्रीकांत अन् अनिकेतची जोडी! ‘एमपील’साठी तगडा संघ मैदानात

Kolhapur Tusker Team Pune: महाराष्ट्र प्रीमिअर लीगच्या (Maharashtra Premier League) मागील पर्वातील उप विजेते कोल्हापूर टस्कर्स संघाने (Kolhapur Tusker Team) अष्टपैलू खेळाडू श्रीकांत मुंढे आणि आक्रमक फलंदाज- यष्टिरक्षक अनिकेत पोरवाल यांना दुसऱ्या पर्वासाठी आपल्या ताफ्यात घेऊन संघाची ताकद वाढवताना दिसत आहे. पुनित बालन ग्रुपच्या यांच्या संघाने पुण्यामधील झालेल्या लिलावात 20 सदस्यीय संघात 9 खेळाडूंचा समावेश करण्यासाठी एकूण 10.90 लाख रुपये खर्च केले आणि त्यांची लिलावाची रणनीती यशस्वीपणे पार पाडताना गोलंदाजीमध्ये काही वैविध्यही आणले. भारताचा माजी फलंदाज केदार जाधवच्या (Kedar Jadhav) नेतृत्वाखाली कोल्हापूर टस्कर्सने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती, परंतु त्यांनी उपविजेतेपद पटकावले होते.

यावर्षी जेतेपद पटकावण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून लिलावामधून संघात मूल्य वाढवणाऱ्या काही स्टार खेळाडूंची निवड करण्याचा संघ व्यवस्थापनाचा निर्धार होता. यावर्षी फेब्रुवारीमध्ये पार पडलेल्या 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत दबावाखाली धावांची खेळी करून भारताला फायनलमध्ये घेऊन जाणाऱ्या सचिन धस याच्यासह महाराष्ट्र प्रीमिअर लीगच्या सर्वाधिक धावा करणाऱ्या अंकित बावणे यांना संघात कायम ठेवण्यात यश मिळाले आहे.

“एकंदरीत एक मजबूत संघ निवडण्याचा आनंद होत आहे. युवा आणि अनुभवी खेळाडूंचा चांगला संगम असल्याने, लाइन-अप विलक्षण दिसते. प्रत्येक खेळाडू संघात त्यांची स्वतःची कौशल्ये आणि सामर्थ्य आणतो. मला विश्वास आहे की हा संघ आगामी हंगामात नवीन उंचीवर घेऊन जाणार आणि कोल्हापूर टस्कर्सच्या चाहत्यांचे व समर्थकांचे मनोरंजन करेल,” असा विश्वास पुनिल बालन यांनी व्यक्त केला.

हॉकीतही ऑस्ट्रेलिया बलाढ्य! पहिल्याच सामन्यात गोलवर्षाव करत केला भारताचा पराभव

लिलावात कोल्हापूर टस्कर्सने 40 हजार रुपयांची मूळ किंमत असलेल्या बिग हिटिंग बॅट्समन पोरवालसाठी 4.50 लाखांची यशस्वी बोली लावण्यात आली. अनुभवी अष्टपैलू मुंढे ( मूळ किंमत 60 हजार रुपये) याला 3 लाख रुपयांत आपल्या ताफ्यात घेतले. 35 वर्षीय मुंडे हा इंडियन प्रीमिअर लीगमधील (Indian Premier League) दोन संघांचा सदस्य होता. त्याने 2011 मध्ये पुणे वॉरियर्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. 2019 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने त्याला आपल्या ताफ्यात घेतले.

19 वर्षांखालील स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पोरवालने दोन अर्धशतके झळकावली आणि 180 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने फलंदाजी करून या वर्षी मार्चमध्ये कारभारी प्रीमियर लीग 2024 मध्ये त्याच्या संघाला विजय मिळवून दिला. संघाने अष्टपैलू यश खलाडकरला 20 हजार रुपयांच्या मूळ किमतीच्या तुलनेत 2.7 लाख रुपयांना खरेदी केले. कोल्हापूर टस्कर्सने लिलावात विकत घेतलेल्या इतर खेळाडूंमध्ये हर्ष संघवी ( 20 हजार ), हर्षल मिश्रा ( 40 हजार ), योगेश डोंगरे ( 30 हजार), हृषिकेश दौंड ( 20 हजार ) आणि सुमित मरकली ( 20 हजार ) यांचा समावेश आहे.

कोल्हापूर टस्कर्सचा संघ – केदार जाधव, अंकित बावणे, सचिन धस, हर्ष संघवी, कीर्तिराज वाडेकर, अनिकेत पोरवाल, हृषीकेश दौंड (19 वर्षांखालील), योगेश डोंगरे, तरनजीत सिंग, आत्मा पोरे, अक्षय दरेकर, श्रेयश चव्हाण, यश खळदकर, निहाल तुसामद, मनोज यादव, डॉ. उमर शहा, हर्षल मिश्रा ( 19 वर्षांखालील ), सुमित मरकली, सिद्धार्थ म्हात्रे, श्रीकांत मुंढे.

follow us