“पाकिटमार शोधा, निवडणुकीत त्याला बाजूला करा”; शरद पवारांच्या निशाण्यावर मोदी-शहा

Sharad Pawar Criticized PM Narendra Modi : ‘मोदींनी एकदा सांगितलं होतं की पेट्रोलचा भाव पन्नास दिवसांत खाली आणतो. हे सांगून आज 1 हजार 450 दिवस झाले. पेट्रोल 50 दिवसांत कमी होणार होतं ते कमी तर झालं नाहीच उलट दीडपट वाढलं. पेट्रोल महाग केलं. डिझेल महाग केलं. ऑईल महाग केलं. साखर स्वस्त केली. दूध स्वस्त केलं. […]

शरद पवार भाषण करत होते, अचानक कुणीतरी अज्ञात वस्तू फेकली; बॉडीगार्डने पकडली

शरद पवार भाषण करत होते, अचानक कुणीतरी अज्ञात वस्तू फेकली; बॉडीगार्डने पकडली

Sharad Pawar Criticized PM Narendra Modi : ‘मोदींनी एकदा सांगितलं होतं की पेट्रोलचा भाव पन्नास दिवसांत खाली आणतो. हे सांगून आज 1 हजार 450 दिवस झाले. पेट्रोल 50 दिवसांत कमी होणार होतं ते कमी तर झालं नाहीच उलट दीडपट वाढलं. पेट्रोल महाग केलं. डिझेल महाग केलं. ऑईल महाग केलं. साखर स्वस्त केली. दूध स्वस्त केलं. तुम्ही पिकवताय ते सगळं स्वस्त आणि जे दुसरे पिकवताहेत त्याला तुमच्या खिशातून जास्त पैसे. आणि सांगताना सांगतात की मी इतके हजार रुपये लोकांच्या खिशात टाकले. घालायचे एका खिशात आणि खालच्या खिशातून काढून घ्यायचे. आता ही पाकिटमारी बंद करायची की नाही? आता ही पाकीटमारी बंद करायची असेल तर हा पाकिटमार कोण असेल निर्णय घेणारा,धोरण ठरवणारा त्याचा शोध घ्यावा लागेल आणि त्यांना बाजूला ठेवावं लागेल. त्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे’, अशा शब्दांत शरद पवार यांनी सरकारी पाकिटमारीवर हल्लाबोल केला.

Sharad Pawar : रशियाचा पुतीन अन् भारताचे मोदी यांच्यात फरक नाही; शरद पवारांचा थेट हल्लाबोल

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी कन्हेरी येथे सभा आयोजित करण्यात आली होती. येथूनच शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराला सुरुवात केली. या सभेत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली. ते पुढे म्हणाले, ‘अमित शहा नावाचे एक गृहस्थ आहेत. नाव ऐकलंय ना. त्यांनी सोलापुरात येऊन भाषण केलं.

दहा वर्षांत शरद पवारांनी काय केलं त्याचा हिशोब द्या’, असे ते म्हणाले. ‘दहा वर्ष कोणते तर 2014 ते 24. या दहा वर्षांच्या काळात राज्य कुणाचं होतं मोदीचं. मंत्रीही हेच होते. त्या काळात मी सत्तेत नव्हतो पण हिशोब मात्र मला मागतात. सत्ता यांच्याकडे पण याची आठवण ते ठेवणार नाहीत’, अशी टीका शरद पवार यांनी अमित शहा यांच्यावर केली.

Sharad Pawar : कारवाईचा फायदा केजरीवालांनाच, भाजपच्या ‘त्या’ दोन जागाही येणार नाही; पवारांचा घणाघात

शेतमाल निर्यातीकडे सरकारचं सपशेल दुर्लक्ष

एक काळ असा होता की सर्वात जास्त उसाचं उत्पन्न उत्तर प्रदेशात व्हायचं. यंदा महाराष्ट्रात आहे. तुम्ही लोकांनी कष्ट केले. कारखाने चांगले चालले. दोन पैसे मिळाले. साखर तयार केली. पण तयार केलेल्या मालाला चांगली किंमत मिळायची असेल तर तो जगात पाठवावा लागतो. देशाची गरज भागून माल शिल्लक राहिलाय. निर्यात करा म्हणून मी सांगतोय त्यावर मात्र बंदी. परवानगी नाही. हा विषय मी अनेकदा मांडला पण काही फरक पडला नाही, अशी खंत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

 

Exit mobile version