Download App

रोहित पवार, युगेंद्र पवारांना सुरक्षा द्या, सुप्रिया सुळेंचं पोलिसांना पत्र; नेमकं कारण काय?

Supriya Sule Letter to Pune Police : राज्यात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत तर काही उमेदवारांची घोषणाही करण्यात आली आहे. दुसरीकडे प्रचाराने वेग घेतला आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार प्रचारासाठी गावोगावी फिरू लागले आहेत. मात्र, आता त्यांच्याच सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी (Supriya Sule) उपस्थित केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांनी पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवावी अशी मागणी खासदार सुळे यांनी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

राज ठाकरेंचा तीन जागांवर दावा, ‘नाशिक’च्या मागणीने भाजप-शिंदे सेनेत अस्वस्थता

सुप्रिया सुळे यांनी पोलीस अधीक्षकांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, की निवडणुकीच्या प्रचारासाठी आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार ठिकठिकाणी जात आहेत. लोकशाही मार्गाने लोकांशी संवाद साधत आहेत. मात्र, काही ठिकाणी त्यांनी दडपशाहीचा सामना करावा लागत आहे. काही लोक घेराव घालून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. तशा बातम्याही आल्या आहेत. हा प्रकार पूर्णपणे असंवैधानिक आहे. या घटनांमुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. विद्येचे माहेरघर पुणे शहरात हे अपेक्षित नाही.

त्यामुळे या प्रकारांची पोलिसांनी दखल घ्यावी. आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना कराव्यात. त्यांना आवश्यक सुरक्षा तातडीने पुरवण्यात यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी या पत्राद्वारे केली आहे. आता सुप्रिया सुळे यांच्या मागणीनंतर पुणे पोलीस काय कार्यवाही करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

रोहित पवार खरंच नाराज आहेत का ? शरद पवार-नीलेश लंके भेटीवर भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

 

follow us

वेब स्टोरीज