रोहित पवार खरंच नाराज आहेत का ? शरद पवार-नीलेश लंके भेटीवर भाजप नेत्याचा गौप्यस्फोट
Ahmednagar News : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपाने खासदार सुजय विखे यांना (Sujay Vikhe) पुन्हा तिकीट दिलं आहे. मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार कोण यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांना (Nilesh Lanke) सोबत घेतल्याने नगरमधील पवार नाराज असल्याचा दावा भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. मोठ्या पवारांनी (शरद पवार) आमदार लंकेंना जवळ घेताच नगर जिल्ह्यातील छोटे पवार (रोहित पवार) नाराज झाले आहेत, असा दावा भाजपाचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडे यांनी केला आहे.
Rohit Pawar यांना डावलून शिंदेंना निमंत्रण; एमआयडीसीच्या बैठकीवरून पुन्हा संघर्ष पेटणार
2024 च्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वच पक्ष कामाला लागले आहेत त्यात भाजपनेही आपले उमेदवार जाहीर केले असून अहमदनगर दक्षिणमधून खासदार सुजय विखे यांना पुन्हा संधी दिली आहे मात्र अहमदनगर दक्षिणमध्ये लोकसभेला महाविकास आघाडीचा उमेदवार अजून निश्चित नाही. महायुतीमधील घटक असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार यांचे खास निलेश लंके यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे लंके लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आहे.
मात्र, लंके यांनी कुठल्या पक्षातून लोकसभा निवडणूक लढवणार हे जाहीर केले नाही. शरद पवार यांनी लंके यांना साथ दिल्यामुळे अहमदनगर जिल्ह्याचे पवार म्हणजे रोहित पवार नाराज असल्याचा दावा भाजपा कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होईल असा दावाच भाजपा कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची राज्यात चर्चा होत आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत. त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुका होणार आहेत. नगर दक्षिण लोकसभेतील महायुतीचा उमेदवार ठरला आहे. मात्र महाविकास आघाडीचं अजून ठरत नाही. या मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असले हे अद्याप समोर आलेलं नाही. याच लोकसभा मतदारसंघात रोहित पवार प्रतिनिधीत्व करत असलेला कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ आहे. अशा परिस्थितीत एकूणच नगर दक्षिण मतदारसंघात शरद पवार गटाची राजकीय ताकद कमी झालेली आहे. त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडी कुणाला संधी देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Nilesh Lanke : माझ्यामुळं अजितदादांना खाली पाहण्याची वेळ येणार, लंके नेमकं काय म्हणाले?