Rohit Pawar यांना डावलून शिंदेंना निमंत्रण; एमआयडीसीच्या बैठकीवरून पुन्हा संघर्ष पेटणार
Rohit Pawar : कर्जत एमआयडीसी वरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) व भाजप आमदार राम शिंदे यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगले होते. यातच आता हा संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज विधानभवनात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये याबाबत एक महत्वाची बैठक पार पडणार आहे.
BREAKING : अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमीचा नवी दिल्ली पुरस्कार जाहीर!
या बैठकीला आमदार राम शिंदे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तर रोहित पवारांना डावलण्यात आले आहे. यामुळे पुन्हा एकदा शिंदे हे पवार यांना वरचढ ठरल्याचे दिसते आहे.
किंग खान पहिल्यांदाच शेअर करणार लेक सुहानासोबत स्क्रीन, लवकरच होणार शूटिंगला सुरूवात
राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील युवकांना रोजगाराची संधी मिळावी. यासाठी रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कर्जत तालुक्यातील पाटेगाव-खंडाळा या ठिकाणी एमआयडीसीसाठी प्रस्ताव सरकारकडे दिला होता. पण कर्जत तालुक्यातील एमआयडीसीची प्रस्तावित जागा वादग्रस्त असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. यातूनच आमदार रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात राजकीय संघर्ष सुरू झाला.
मोठी बातमी! गुजरातमध्ये तब्बल 3300 किलो अंमली पदार्थ जप्त; 5 जणांना अटक
जागा निश्चितीसाठी आता पुन्हा एकदा एमआयडीसी प्राधिकरणाला आदेश दिला आहे. त्यानुसार कर्जत-जामखेडमध्ये आमदार शिंदे यांच्या उपस्थित बैठकांचे सत्र सुरू झाले. उद्योग मंत्रालयाने आता कर्जत-जामखेड एमआयडीसीसंदर्भात बैठक नियोजित केली आहे. या बैठकीसाठी उद्योग मंत्रालयाने निमंत्रितांची यादी काढली आहे. यात पुन्हा एकदा आमदार रोहित पवार यांना डावलण्यात आले आहे.