Download App

मुरलीधर मोहोळाचं वाढलं बळ! गणेश मंडळ, ढोल ताशा पथकांचा जाहीर पाठिंबा

पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह, नवरात्रोत्सव आणि ढोल-ताशा पथकांनी मुरलीधर मोहोळ यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

Pune Lok Sabha Election : पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचं बळ आणखी वाढलं आहे. पुणे शहरातील प्रमुख सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह, नवरात्रौत्सव आणि ढोल-ताशा पथकांनी जाहीर पाठिबा दिला आहे. गणेश मंडळांचा कार्यकर्ता संसदेत गेला पाहिजे. त्या माध्यमातून पुणे शहराच्या प्रश्नांसमवेत गणेश मंडळांचे प्रश्न शासन दरबारी जातील आणि ते सुटतील अशी भावना मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांच्या पुढाकाराने प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळ, नवरात्रोत्सव मंडळ आणि ढोल-ताशा पथक यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मुरलीधर मोहोळ, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, शैलेश टिळक, राहुल जाधव, नितीन पंडित, विकास पवार, सूर्यकांत पाठक, धीरज घाटे, निलेश वकील, संजीव जावळे, युवराज निंबाळकर, नवनाथ पठारे, हेमंत रासने, राजेंद्र अण्णा देशमुख, प्रवीण तरडे, अजय भोसले, आनंद सागरे उपस्थित होते.

Loksabha Election 2024 : इंडिया आघाडी भ्रष्टाचारीच, अमित शाहांनी १० वर्षांचा हिशोबच दिला

या मेळाव्यात बोलताना पुनीत बालन म्हणाले, या मेळाव्याचे आयोजन केल्यानंतर मला अनेकांनी विचारले की तुम्ही भाजपाचे काम करता का? त्यावर मी कोणत्याही पक्षाचा राजकीय कार्यकर्ता नाही तर गणेश मंडळाचा कार्यकर्ता आहे. मुरलीधर मोहोळ हे गणेश मंडळाचे कार्यकर्ते असून ते माझे मित्र आहेत. आपल्याला आपल्या कार्यकर्त्याला दिलीला पाठवायचे आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त मतदान होईल यासाठी प्रयत्न करा.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे महेश सूर्यवंशी म्हणाले, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक आणि आयटी अशा सर्वच क्षेत्रात पुण्याचा देशभरात लौकिक आहे. हा लौकिक वाढवायचा असेल तर मंडळाचा कार्यकर्ता संसदेत पाहिजे. त्यासाठी आपल्याला मोहोळ यांना पाठिंबा द्यावा लागेल. ते संसदेत गेले तर निश्चितपणे मंडळाचे प्रश्न शासन दरबारी जातील. ढोल ताशा महासंघाचे पराग ठाकूर म्हणाले, गणेश मंडळांचे जसे प्रश्न आहेत तसेच कोणत्याही शुभ कार्याची सुरवात करणाऱ्या ढोल ताशा पथकांची सुद्धा प्रश्न आहेत. या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपला खासदार हवा आहे. यावेळी शैलेश टिळक, अभिनेते प्रविण तरडे, धीरज घाटे यांच्यासह अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करीत मोहोळ याना जाहीर पाठिंबा व्यक्त केला.

Pune Lok Sabha: मुरलीधर मोहोळ यांच्या पाठीशी उद्योजक पुनीत बालन यांची ‘युवा’ ताकद !

दहा वाजले अन् स्पीकर बंद

गणेशोत्सवात नियमांचे पालन करणाऱ्या मंडळांनी या बैठकीतही नियमांचे पालन केले. बैठक सुरू असताना आणि पदाधिकारी स्टेजवर बसून बोलत असताना घड्याळात दहा वाजले. यावेळी आयोजकांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करीत लगेचच माईक आणि स्पीकर बंद केले. आणि स्टेजवर बसलेले मंडळी खाली येऊन जेवणावळीत ही बैठक पार पडली.

follow us