Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा (Supriya Sule) मोबाइल फोन हॅक झाला आहे. या प्रकाराने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअप हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून आता पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. या प्रकाराची माहिती देत सुप्रिया सुळे यांनी मला कुणीही मेसेज अथवा फोन करू नका असे आवाहन त्यांनी एक्सवर पोस्ट लिहून केले आहे.
*** अत्यंत महत्वाचे ***
माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी. – सुप्रिया सुळे— Supriya Sule (@supriya_sule) August 11, 2024
सुप्रिया सुळे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे, की माझा फोन आणि व्हॉट्सअप हॅक झाले आहे. कुणीही मला मेसेज किंवा फोन करू नये. याबाबत मी पोलीस तक्रार करणार आहे. कृपया याची नोंद घ्यावी. सुप्रिया सुळे सध्या पुणे (Pune) दौऱ्यावर आहेत. पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचे काल त्यांनी बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha Constituency) मतदारसंघात मोठ्या उत्साहात स्वागत केले. यानंतर खडकवासला येथे यात्रेचे आगमन झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास फोन आणि व्हॉट्सअप हॅक झाल्याचं लक्षात आलं. यानंतर त्यांनी लगेचच या प्रकाराची माहिती सोशल मीडियावर दिली. माझा फोन आणि व्हॉट्सअप हॅक झाले आहे. कुणीही मला मेसेज किंवा फोन करू नये. याबाबत मी पोलीस तक्रार करणार आहे. कृपया याची नोंद घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.
video: पुणेकराने थांबवली आमदाराची गाडी; सायरन वाजवला म्हणून झाप झाप झापलं; पाहा व्हिडिओ