आधी भाजपवर गुन्हे दाखल करा; ‘त्या’ फोटोवर रुपाली ठोंबरेंचे स्पष्टीकरण

kasba By Election : कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत (Kasba By Election) मतदान करतानाचा फोटो सोशल मिडियावर शेअर केल्याच्या प्रकारामुळे चांगलाच गदारोळ उठला आहे. या मुद्द्यावर आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombare patil) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘मुळात हा फोटो मी काढलेलाच नाही. कसब्यातील मतदारांनीच मला हा फोटो पाठवला होता. तो फोटो मी […]

Rupali Thombare

Rupali Thombare

kasba By Election : कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत (Kasba By Election) मतदान करतानाचा फोटो सोशल मिडियावर शेअर केल्याच्या प्रकारामुळे चांगलाच गदारोळ उठला आहे. या मुद्द्यावर आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombare patil) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘मुळात हा फोटो मी काढलेलाच नाही. कसब्यातील मतदारांनीच मला हा फोटो पाठवला होता. तो फोटो मी डीपीला ठेवला. मी कोणताच गुन्हा केलेला नाही. कायदा मलाही माहित आहे. भाजपने (BJP) ही निवडणूक हिंदू मुस्लिमांवर नेली. जाती धर्मावर केली. त्यांच्यावर आधी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. उपमुख्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत’ असे ठोंबरे म्हणाल्या.

वाचा : रुपाली ठोंबरे अडचणीत; मतदान करतानाचा ईव्हीएमचा फोटो केला व्हायरल

भाजपने गुन्हेगार आणले, भाजपने पैसे वाटले. भाजप विकासाच्या मुद्द्यांवर बोलत नाही. त्यांनी ही निवडणूक जाती-धर्मावर आणली आहे. निवडणूक आयोग व पोलिसांकडे आम्ही ज्या तक्रारी दाखल केल्या. त्यांच्यावर आधी गुन्हे दाखल करा. त्यानंतर खुशाल माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करा. मी तोंड द्यायला समर्थ आहे, असे आव्हान त्यांनी दिले.

कसबा, चिंचवडकरांच्या मनात नक्की काय? मतदान संथगतीनं

गोपनियतेचा भंग केला म्हणून ओरड केली जात आहे. मी कोणताच गोपनियतेचा भंग केलेला नाही.अजून मतदानही केलेले नाही. हे कायद्याचे राज्य आहे. कायद्यानेच चालले पाहिजे. मुळात आता भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मतदारांना आता गृहीत धरू नका, असेही त्यांनी बजावले.

Exit mobile version