कसबा, चिंचवडकरांच्या मनात नक्की काय? मतदान संथगतीनं…

कसबा, चिंचवडकरांच्या मनात नक्की काय? मतदान संथगतीनं…

पुणे : जिल्ह्यातील (Pune)कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी (Bypoll Election)आज मतदान सुरु आहे. या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. कसबा आणि चिंचवडमध्ये दोन्ही मतदार संघात नागरिकांनी सकाळी लवकर जाऊन मतदान केलंय. त्यात अनेक ज्येष्ठ नागरिकांचाही सामवेश आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघात दुपारी 1 वाजेपर्यंत 20.68 टक्के मतदान तर कसबा विधानसभा मतदारसंघात 18.5 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आहे.

चिंचवड विधानसभा मतदार संघात मतदान सुरु आहे. या मतदार संघामध्ये एकूण 5 लाख 68 हजार 954 मतदार असून 510 मतदार केंद्रावर मतदान होत आहे. सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी 3.52 टक्के तर 11 वाजेपर्यंत 10.45 टक्के मतदान झालं. त्याचबरोबर दुपारी 1 वाजेपर्यंत 20.68 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे.

रुपाली ठोंबरे अडचणीत; मतदान करतानाचा ईव्हीएमचा फोटो केला व्हायरल

कसबा मतदार संघात 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी 9:30 वाजेपर्यंत कसब्यात 6.5 टक्के मतदान झालं. तर सकाळी 11 वाजेपर्यंत 8.2 टक्के मतदान झालं, त्याचबरोबर दुपारी 1 वाजेपर्यंत 18.5 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आलीय. या मतदार संघातील मतदान केंद्रावर मतदारांच्या मोठ्या रांगाच रांगा पाहायला मिळाल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube