Download App

भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी भाजपचे माजी केंद्रीय मंत्री दिल्लीतून थेट पुण्यात! मुळीक बंधूंना घेतलं सोबत

Pune News : भटक्या कुत्र्यांच्या त्रासाने पुण्यातील ब्रह्मा सनसिटी सोसायटीतील रहिवासी प्रचंड हैराण झाले आहे. भटक्या कुत्र्यांनी सोसायटीत अगदीच उच्छाद मांडला आहे. भटक्या कुत्र्यांचा त्रास इतका वाढला आहे की लोकांवर हल्ला करण्यापर्यंत या कुत्र्यांची मजल गेली आहे. या समस्येतून सुटका कशी करून घ्यायची या विवंचनेत रहिवासी असतानाच त्यांच्या मदतीला आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी  माजी केंद्रीय मंत्री थेट पुण्यात दाखल झाले आहेत. त्यांच्या सोबतीला भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि माजी PMC स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीकही आहेत.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री विजय गोयल दिल्लीतील भटक्या कुत्र्यांच्या त्रासाविरोधात आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून या मुद्द्यावर लढा देत असलेल्या पुण्यातील एका गृहनिर्माण संस्थेला भेट दिली.

फ्रॅंचायझी देण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्याची 30 लाखांची फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल

पुण्यातील ब्रह्मा सनसिटी ही सोसायटी गेल्या अनेक वर्षांपासून भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाचा सामना करत आहे. मागील दहा वर्षात या सोसायटीतील कु्त्र्यांची संख्य 7 वरून 70 पर्यंत पोहोचली आहे. कुत्र्यांची संख्या वेगाने वाढण्यामागेही तशीच कारणे आहेत. कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची अपयशी ठरलेली मोहिम आणि श्वानप्रेमींनी बेकायदेशीरपणे बाहेरून आणलेले कुत्रे. यांमुळे ही समस्या वाढली आहे.

आता या भटक्या कुत्र्यांमुळे येथील नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कुत्र्यांमुळे सोसायटीत घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खेळाची मैदाने, उद्याने, पदपथ, स्विमिंग पूल, पार्किंग एरिया या सर्व ठिकाणी कुत्र्यांनी कब्जा केला होता आणि रहिवाशांवर वारंवार कुत्र्यांकडून हल्ले केले जात होते. मागील फेब्रुवारी महिन्यात सोसायटीतील एक लहान मुलावर कुत्र्याने हल्ला केला होता. या घटनेत मुलगा जखमी झाला होता.

या घटनेची गंभीर दखल घेत पुणे महापालिकेने कुत्र्यांना हाकलून दिले. मात्र, एका स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्तीने नियमांचा हवाला देत कुत्र्यांना आत सोडण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाकडून मिळाला. हायकोर्टाने परवानगी दिल्यावर सोसायटीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती मिळवली.

पुण्यातील प्रसिध्द हिल स्टेशन लवासा विकले, तब्बल 1800 कोटींना विक्री

यानंतर सोसायटीतील नागेंद्र रामपुरिया यांनी गोयल यांची भेट घेत त्यांना भटक्या कुत्र्यांच्या त्रासाची माहिती दिली. त्यांनीही लोकांच्या समस्या ऐकून घेत मदतीचे आश्वासन दिले. त्यानंतर आज विजय गोयल यांनी पुणे दौऱ्यात भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, योगेश मुळीक यांच्यासह ब्रम्हासन्सिटीला भेट दिली. मुळीक बंधूंनी वडगावशेरी आणि आसपासच्या भटक्या कुत्र्यांच्या त्रासाशी संबंधित समस्या आणि अडथळे दूर करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

गोयल यांनी सांगितला कुत्र्यांच्या बंदोबस्ताचा जालीम उपाय

गोयल यांनी सोसायटीतील नागिरकांशी संवाद साधला. भटक्या कुत्र्यांची समस्या सोडविण्यासाठी 10 कलमी कार्यक्रम राबविण्याची गरज आहे. भटक्या कुत्र्यांचे 100 टक्के निर्बिजीकरण, कुत्र्यांना अँटी रेबीज इंजेक्शन, भटक्या कुत्र्यांसाठी कायमस्वरूपी निवारागृहे, वारंवार चावणाऱ्या कुत्र्यांवर कारवाई, कार्यक्षम श्वान दत्तक धोरण, भटके कुत्रे चावलेल्या रुग्णांना मोफत उपचार असा दहा कलमी कार्यक्रम राबवावा, असे गोयल म्हणाले. पुणे तसेच मुंबईतील विविध सोसायट्यांचे रहिवासी त्यांच्या आव्हानांवर चर्चा करण्यासाठी आणि सर्वोच्च न्यायालयात असणाऱ्या याचिकेत ब्रम्हा सनसिटीला सामील करून घेण्यासाठी आले होते.

Tags

follow us