Download App

“मी ठाम, ज्या दिवशी निवडणुकीत उतरेल त्या दिवशी”.. भाजपाचा उल्लेख करत मोरेंचा रोखठोक इशारा

Vasant More on Pune Lok Sabha Election : वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर नव्या राजकारणाची सुरुवात केली आहे. काही झालं तरी लोकसभा निवडणूक लढण्यावर (Lok Sabha Election) ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  माझं पुढील राजकीय भविष्य उज्ज्वलच आहे. फक्त मी सध्या थोडा वेळ घेतोय. पुणे लोकसभेची निवडणूक चौथ्या टप्प्यात होत आहे. जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीच्या सध्या बैठका सुरू आहेत. महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षांच्या मी भेटीगाठी घेतल्या आहेत. जे करायचं ते चांगलं करायचं यासाठी मी थोडा वेळ घेतोय. ज्या दिवशी मैदानात उतरू त्या दिवशी पुणे लोकसभेचे चित्र बदलणार आहे. ही लढत एकतर्फी होईल, असा दावा वसंत मोरे (Vasant More) यांनी केला.

Vasant More : राजसाहेबांची वेळ मागितली होती पण..,; नाराजीची कहाणी सांगताना मोरे हुंदके देत रडले

वसंत मोरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीबाबत भाष्य केले. महाविकास आघाडीने जर तिकीट दिलं नाही तर अपक्ष लढणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर मोरे म्हणाले, मी निवडणूक लढण्यावर ठाम आहे. मी आता जी काही सांगड घालण्याचा प्रयत्न करतोय ती योग्य पद्धतीने होईल आणि ती पुणे शहराच्या हिताची असेल. मी जरी अपक्ष लढलो तरी एक नंबरवरच असेल. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ ज्यावेळी महापौर होते त्यांच्या अगोदर मी विरोधी पक्षनेता होतो. वसंत मोरेच्या जीवनात संघर्ष आहे. पण या संघर्षातून मी मोठा विजयही मिळवला आहे. त्यामुळे आताच्य संघर्षातूनही मी मार्ग काढील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वसंत मोरे अपक्ष उभे राहिले तरी काही फरक पडणार नाही, असे वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यावरही मोरे यांनी पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. माझ्या उमेदवारीने जर काही फरकच पडणार नसता तर दादांनी मला भाजप प्रवेशाची ऑफर दिलीच नसती. पुण्यातील एका कार्यक्रमात मला भाजपात येण्याची ऑफर दिली होती. पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं माझ्या तिन्ही टर्म भाजपविरोधात झाल्या आहेत आणि मी विजयी देखील झालो. त्यामुळे वसंत मोरेच्या उमेदवारीने काय फरक पडेल हे पुणेकर लवकरच दाखवून देतील, असा  इशारा मोरे यांनी दिला.

Vasant More : नाव घेतलं की अख्खं शहर हलतंय; ठाकरेंच्या शिलेदारची सूचक पोस्ट

मी पुणे लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलं आहे त्यामुळे मला इथे निवडणूक जिंकण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील ते करत आहे. मात्र मी राज साहेब ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावर आता कोणतंही भाष्य करणार नाही असे स्पष्ट करत राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावर अधिक बोलणे मोरे यांनी टाळले.

follow us