Download App

चर्चा तर होणारच ना ! पिंपरीत अजितदादांचे भव्य फलक पण, राष्ट्रवादीच गायब

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकारणात रंगल्या आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीच्या (NCP) 53 पैकी 40 आमदारांनी आपल्या संमतीच्या स्वाक्षऱ्या अजित पवार यांच्याकडे दिल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले होते. या वृत्तानंतर राज्यात मोठा गदारोळ उठला. खुद्द अजित पवार यांनाच माध्यमांसमोर येऊन भूमिका स्पष्ट करावी लागली होती.

मात्र अजूनही संभ्रमाची परिस्थिती कायम आहे. याची प्रचिती आज पिंपरी चिंचवड येथे आली. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांचे लागलेले फ्लेक्स चर्चेचा विषय ठरले आहेत. माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी हे फ्लेक्स लावले आहेत. खास गोष्ट म्हणजे, या फ्लेक्समध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख कुठेच दिसत नाही. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. नेमका हा उल्लेख राहिला कसा ?, जाणूनबुजून असे करण्यात आले का ?, असे प्रश्न आता विचारले जात आहेत.

पुणे लोकसभेसाठी राष्ट्रवादीचं गुडघ्याला बाशिंग…

राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून अजित पवार चर्चेत आहेत. ते भाजपसोबत जाणार का, याचीही चर्चा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी एका इंग्रजी वृत्तपत्राने राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांनी आपल्या संमतीच्या स्वाक्षऱ्या अजित पवार यांच्याकडे दिल्याचे या वृत्तात म्हटले होते. यानंतर राज्यात मोठा गदारोळ उठला. अजितदादा खरेच बंड करणार का ? याचीच चर्चा सुरू होती.

मात्र, पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत भूमिका स्पष्ट केली. मी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगत या चर्चांना पू्र्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मात्र, या सगळ्या घडामोडीनंतर जे गोंधळाचे आणि अविश्वासाचे वातावरण तयार झाले आहे ते अजून तरी कायम असल्याचे दिसत आहे.

रोहित पवारांना धक्का देणाऱ्या तालुकाध्यक्षाची हकालपट्टी !

आज पिंपरी चिंचवड येथे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी अजित पवार यांच्या समर्थनार्थ भव्य फ्लेक्स लावले आहेत. मात्र या फलकात एक गोष्ट ठळकपणे दिसत आहे ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठेच उल्लेख नाही. या फ्लेक्सवर ‘दादा आम्ही तुमच्या सोबत आज, उद्या आणि सदैव.. असा मजकूर आहे. मात्र, राष्ट्रवाद काँग्रेस पक्षाचा उल्लेख काही दिसत नाही. त्यामुळे परिसरात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

Tags

follow us