पुणे लोकसभेसाठी राष्ट्रवादीचं गुडघ्याला बाशिंग…

पुणे लोकसभेसाठी राष्ट्रवादीचं गुडघ्याला बाशिंग…

Pune Loksabha By Election: पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat)यांच्या निधनानंतर पुण्याची लोकसभेची (Pune Lok Sabha)जागा रिक्त झाली आहे. या जागेवर आता पोटनिवडणूक (By-elections)जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपसह (BJP)सर्वच प्रमुख पक्षातील नेत्यांनी लॉबिंगला सुरुवात केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांच्या वाढदिवसानिमित्त पक्ष कार्यालयाबाहेर भावी खासदार (Future MP)म्हणून बॅनरबाजी (banner battle)करण्यात आली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Adipurush : ‘आदिपुरुष’ची ‘जय श्री राम’ गाणं झालं रिलीज; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

गिरीश बापट यांचे निधन झाल्यानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाल्याने पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे सर्वच पक्षातील नेते मंडळींना खासदारकीचे वेध लागले आहेत.

काही दिवसांपूर्वी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचे भावी खासदार म्हणून बॅनर तर बापट जाऊन काही दिवसही होत नाही तोच लागले होते. यावरुन विरोधकांनी टीका केल्यानंतर त्यांनाही यावर स्पष्टीकरण द्यावे लागले होते.

दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाल्याने महाविकास आघाडीचा कमालीचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्यामुळे पुणे लोकसभेची पोटनिवडणूक जर लागली तर आपण जिंकू, असा विश्वास अनेकांना वाटत आहे.
त्यामुळेच राष्ट्रवादीकडून देखील ही जागा आपण लढवावी अशी इच्छा खुद्द प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली असून शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासाठी तशी मागणी करणार असल्याचं उघड मत त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलं होत. त्यामुळे जगतापांचे समर्थक अधिकच जोमात आहेत.

पुणे लोकसभेची काँग्रेसची पारंपारिक जागा आहे. मात्र, राष्ट्रवादीकडूनच निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे. यावर काँग्रेसकडूनही प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. ही आमचीच जागा असल्याने आम्ही या जागेवर दावा का? करावा, असं मत काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी ‘लेट्सअप’शी बोलताना सांगितलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीकडून पुणे लोकसभेवरील दावा सांगितला जात असून शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या वाढदिवसानिमित्त भावी खासदार म्हणून त्यांच्या नावाची मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये पुण्यात लोकसभेच्या जागेवरून काही चर्चा तर झाली नाही ना? असाही प्रश्न अनेकांना पडू लागला आहे.

दरम्यान, पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता असून भाजपकडूनही उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यामध्ये गिरीश बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार मेधा कुलकर्णी, खासदार संजय काकडे ही नावे चर्चेत आहेत. तर काँग्रेसकडून मोहन जोशी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि नुकतेच आमदार झालेले रवींद्र धंगेकर यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे.

आता या स्पर्धेमध्ये राष्ट्रवादीकडून प्रशांत जगताप यांचं नावदेखील पुढे आलं आहे. मात्र, पुणे लोकसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार का? की निवडणूक लागणार यावर देखील चर्चा सुरू आहेत. मात्र, तूर्तास तरी भाजप आणि महाविकास आघाडीचे नेत्यांकडून शक्ती प्रदर्शनाची कुठलीही संधी सोडली जात नसल्याचं चित्र दिसत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube