Adipurush : ‘आदिपुरुष’ची ‘जय श्री राम’ गाणं झालं रिलीज; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 30T120322.303

Adipurush : ओम राऊत दिग्दर्शित आणि भूषण कुमार निर्मित ‘आदिपुरुष’ (Adipurush Movie) हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर (Social media) चर्चेचा विषय आहे. आदिपुरुष चित्रपटाच्या पोस्टरसोबतच चित्रपटाच्या संगीतालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे, आणि योग्य कारणांमुळे चित्रपट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

आदिपुरुष चित्रपटाचा पोस्टरसह लॉन्च केलेला 60 सेकंदांचा ‘जय श्री राम’ (Jai Shri Ram) ऑडिओ (Audio ) सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे, चाहत्यांनी या ऑडिओचे मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहेत. या ऑडिओला एवढा मोठा प्रतिसाद मिळत आहे की आता चाहत्यांनी हा ऑडिओ वेगवेगळ्या भाषांमध्ये आणि वेगवेगळ्या व्हर्जनमध्ये रिलीज करण्याची मागणी चित्रपटाच्या टीमकडे करण्यात आली आहे.

या गाण्याभोवतीचा उत्साह मनोज मुनताशीरचे दैवी गीत आणि अजय-अतुलची भव्य रचना चाहत्यांच्या हृदयाला भिडली आहे. आदिपुरुष या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनन, सैफ अली खान आणि सनी सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे आणि टी-सीरीजचे भूषण कुमार आणि कृष्ण कुमार, ओम राऊत, प्रसाद सुतार आणि रेट्रोफाईल्सचे राजेश नायर यांनी निर्मिती केली आहे.

Chauk चित्रपटाचा टीझर रिलीज, पुन्हा दिसणार प्रविण तरडेंची खास शैली

हा चित्रपट 16 जून 2023 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. टीझरमध्ये वापरण्यात आलेल्या व्हीएफएक्सवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. तसेच या चित्रपटातील सैफच्या लूकवरूनही वाद निर्माण झाला. अनेकांनी सैफच्या लूकवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते.

Tags

follow us