Pune Porsche Accident : पुणे अपघात प्रकरणातील (Pune Porsche Accident) अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला असून त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासानंतर तो सज्ञान आहे की अज्ञान हे ठरवलं जाणार आहे. तोपर्यंत त्याला 14 दिवसांसाठी बालसुधारगृहात ठेवण्यात आलं आहे. कल्याणी नगर भागात शनिवारी (Kalyani Nagar Accident) मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात जामीन मिळालेल्या अल्पवयीन बिल्डर पुत्राला आज (दि.22) बाल हक्क न्यायालयता हजर करण्यात आले. यावेळी सुनावणीदरम्यान बाल हक्क न्यायालयाने निर्णय दिला आहे.
अल्पवयीन आरोपीला प्रौढ ठरवून खटला चालल्यास त्याला अधिक कठोर शिक्षा होऊ शकते. पण आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला कायद्यातील तरतुदींच्या आधारे काही लाभ मिळणार आहेत. आता त्याची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. या ठिकाणी त्याला पुढील 14 दिवस व्यतित करावे लागणार आहे. बालसुधार गृहात त्याचा दिनक्रम कसा असेल याची माहिती समोर आली आहे.
Pune Accident : पडकं हॉटेल, 6 जोडी कपडे, अन् अंथरुण; विशाल अग्रवाल नेमका कुठं लपला होता?
बालसुधार गृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे. बालसुधार गृहातील रोजचा दिनक्रम अतिशय वेगळा असतो. सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत सकाळची आवराआवर करून नाश्ता दिला जातो. नाश्त्यात शक्यतो पोहे, उपीट, अंडी आणि दूध असे पदार्थ असतात. त्यानंतर दररोज सकाळी 11 वाजता प्रार्थना होते. सकाळी 11 ते दुपारी 1 यावेळेत इंग्रजी आणि विविध विषयांच्या शिकवण्या घेतल्या जातात.
यानंतर दुपारी 1 ते 4 यावेळेत आराम असतो. सायंकाळी 4 वाजता पुन्हा नाश्ता दिला जातो. पुढे 5 वाजेपर्यंत टिव्ही पाहण्यासाठी वेळ असतो. सायंकाळी 5 ते 7 यावेळेत व्हॉलीबॉल, फुटबॉल असे मैदानी खेळ खेळण्यासाठी वेळ दिला जातो. सायंकाळी 7 नंतर जेवणासाठीची वेळ असते. यानंतर रात्री 8 वाजता डॉर्मेटरीमध्ये झोपण्यासाठी रवानगी होते. रात्रीच्या जेवणात पालेभाज्या, चपाती, वरण भात असे वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य पदार्थ असतात.
Pune Porsche Accident : जामीन रद्द! अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहात रवानगी…
विशाल अग्रवालला तीन दिवसांची पोलीस कोठडी
कल्याणी नगर अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवालला बुधवारी पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद करण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने कल्याणीनगर अपघात प्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अग्रवालसह न्यायालयाने नितेश शेवानी आणि व्यवस्थापक जयेश गावकरे यांनाही 24 मेपर्यंत कोठडी सुनावली आहे.