Download App

LIVE BLOG : मुंबई पुण्यासह राज्यभर पावसाचा हाह:कार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा…

राज्यात पावसाचा जोर वाढला असून काल दिवसभर अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होत आहे. पुण्यात काल रात्रभर अतिमुसळधार पाऊस कोसळत होता.

Pune Rains : राज्यात पावसाचा जोर वाढला असून काल दिवसभर अनेक जिल्ह्यांत मुसळधार (Pune Rains) पाऊस होत आहे. पुण्यात काल रात्रभर अतिमुसळधार पाऊस कोसळत होता. राज्याची राजधानी मुंबईतही पावसाने (Mumbai Rains) जोर धरला आहे. पुण्यात पावसाने जोर धरल्याने धरणांच्या (Heavy Rainfall) पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. आजही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज पुणे शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.तसेच नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

LIVE NEWS & UPDATES

  • 25 Jul 2024 03:59 PM (IST)

    अजित पवार यांची पूरपरिस्थिती दरम्यान पुण्यात पत्रकार परिषद

    काल रात्रीपासून पुण्यात मुसळधार पाऊस (Heavy rain) पडत आहे. या पावसामुळे पुण्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. यासाठी उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली, नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं.

  • 25 Jul 2024 03:17 PM (IST)

    पुण्यात पावसाचा हाह:कार; जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितला ग्राउंड रिपोर्ट

    Pune Collector Press Conferance on Pune Rain : : पुणे शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान (Pune Heavy Rains) घातले आहे. पावसाने शहराची दैना उडाली आहे. ग्रामीण भागातही जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी परिस्थितीचा घेतलाला आढावा मांडला. तसेच नागरिकांना खबरदारी पाळण्याचे आवाहन केले आहे.

  • 25 Jul 2024 02:21 PM (IST)

    अजित पवारांकडून पुण्यासह राज्यातील अतिवृष्टीचा आढावा

    पुणे आणि राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी पुण्यासह राज्यातील सर्वच ठिकाणच्या अतिवृष्टी परिस्थितीचा आढावा घेतला.

  • 25 Jul 2024 01:38 PM (IST)

    सांगली-कोल्हापूरसाठी सतेज पाटील मैदानात; कर्नाटकच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट

    कर्नाटकमधील अलमट्टी धरणामधून पाण्याचा विसर्ग झाला नाही. तर राज्यातील सांगली आणि कोल्हापूरमध्ये पूर परिस्थिती उद्भवते. या अगोदर अशी आपत्ती निर्माण झालेली आहे. त्यामुळे यावेळी अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कॉंग्रेस नेते सतेज पाटील यांनी अलमट्टी धरणातून पाणी सोडावे यासाठी सतेज पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली आहे.

  • 25 Jul 2024 01:26 PM (IST)

    मुंबईकरांना दिलासा! 10 टक्के पाणी कपात मागे...

    - ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभागातील ग्रामपंचायतींसह महानगराच्या पाणीपुरवठ्यातील 10 टक्के पाणी कपात सोमवार 29 जुलै पासून मागे

    - दमदार पावसाने महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहार, तुळशी, तानसा, मोडकसागर चार जलाशयांच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ

  • 25 Jul 2024 01:12 PM (IST)

    पुण्यात पावसाचा कहर, पर्यटन स्थळं 24 तासांसाठी बंद!

    - महानगर पालिका हद्दीत बालेवाडी ब्रीज, मुळा नदी ब्रीज, संगम रोड ब्रीज, होळकर ब्रीज, संगमवाडी ब्रीज, महर्षी शिंदे ब्रीज, हडपसर- मुंढवा रोड ब्रीज, मातंग ब्रीज, येरवडा शांतीनगर ब्रीज, निंबजनगर ब्रीज, मोई, व चिकली रस्त्यावरील इंद्रायणी पुल पाण्याखाली.

    - एकता नगरी सिंहगड रोड, निंबजनगर परिसर, पिंपरी चिंचवड, आकुर्डी, कुंदननगरमध्ये सोसायट्यांमध्ये शिरले पाणी. नागरिकांना खाद्य पदार्थ आणि पाणी देत मदत आणि बचाव कार्य सुरू.

    - भिडे पूला शेजारी पूलाचीवाडी येथे विजेचा शॉक लागून3 तरूणांचा मृत्यू.

    - मुळशीच्या लवासा रोडवर, लवासा लेक सिटी येथील बंगल्यावर, भिमाशंकर-खेड रोड, वेल्ह्यातील वडघर येथे दरडी कोसळल्या. एनडीआरएफकडून बचाव कार्य.

  • 25 Jul 2024 12:46 PM (IST)

    विद्यार्थ्यांनो टेन्शन नको! बारावीच्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा होणार

  • 25 Jul 2024 12:41 PM (IST)

    Pune Rains : सिंहगड रस्त्यावर एनडीआरएफची दोन पथके कार्यरत: केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

  • 25 Jul 2024 12:39 PM (IST)

    पुण्याला पाण्याचा विळखा, मुठा नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग वाढला

    पुण्यातील जोरदार पावसामुळे शहराला पाण्याचा विळखा पडला आहे. सद्यस्थितीत सगळीकडे पाणीच पाणी दिसत आहे. पुण्यातील मुठा नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. नागरिकांना सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

follow us