कुरुंदवाड : इंद्रायणी बालन फाउंडेशन आणि पुनित बालन ग्रुप यांचे समाजोपयोगी कार्य वाखाणण्याजोगे आहे, असे गौरवोद्गार स्पेशल कमांडो सिक्युरिटी विभागाचे पोलीस सुहास पाटील यांनी काढले. शिरोळ तालुक्यातील (जि. कोल्हापूर) श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलसाठी इंद्रायणी बालन फाउंडेशन व पुनीत बालन ग्रुप यांच्यावतीने इंट्रॅक्टीव्ह पॅनल देण्यात आले. याप्रसंगी पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. वाय. पाटील उपस्थित होते. या ग्रुपमार्फत (Punit Balan Group) संस्थेला सुमारे 12 लाख रुपयांचे 6 इंट्रॅक्टीव्ह पॅनल मंजूर करण्यात आले आहेत.
विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद पाटील म्हणाले, शिक्षण, खेळ, समाज व देशातील जवानाप्रती असलेली आपुलकी बालन ग्रुप यांच्या कार्यातून स्पष्ट होते. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांनी बालन ग्रुप यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. यासाठी सुहास पाटील यांनी पाठपुरावा केला म्हणून संस्थेमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. उदय पाटील यांनी स्वागत करताना नवीन तंत्रज्ञानाचा वापर शैक्षणिक गुणवत्ता वाढी साठी होत असल्याचे मत व्यक्त केले. आभार आर. एस. खोपडे यांनी मानले.
पुनित बालन ग्रुप ‘फ्रेंडशिप करंडक’ : साई पॉवर हिटर्स संघाने सलग दुसऱ्या वर्षी पटकावली ट्रॉफी