Download App

तावरेंची ‘दादांना धोबीपछाड’; वयावरुन हिणवलं…पण चंद्रराव तावरेंनी सांगवी गटात बाजू सारली

Chandrarao Taware Wins Against Ajit Pawar Nilkantheshwar Panel : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा (Malegaon Sugar Factory Election) निकाल काल जाहीर झाला. सगळ्या राज्याचं अन् सहकार क्षेत्राचं लक्ष या निकालाकडे लागलेलं होतं. या निवडणुकीत अजित पवारांच्या (Ajit Pawar) नेतृत्वाखाली नीळकंठेश्वर पॅनलने दणक्यात विजय मिळवला. त्यांच्या पॅलने 21 पैकी 20 जागा जिंकल्या. तर शरद पवारांच्या बळीराजा पॅनेल आणि चंद्रकांत तावरे ( Chandrarao Taware) यांच्या पॅनलचा सुपडासाफ केलाय.

सांगवी गटातून विजय

अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री अन् अर्थमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या दिमतीला मोठी यंत्रणा आहे. अजित पवारांनी कारखान्याला पाचशे कोटी रूपयांचं पॅकेज देण्याची घोषणा केली. त्यामुळे अजित पवार सर्वच जागांवर सहज विजय मिळवतील, असा अंदाज होता. परंतु या निवडणुकीत सर्वांत बुजुर्ग उमेदवार चंद्रकांत तावरेंनी अजित पवारांचं हे स्वप्न पूर्ण होवू दिलं नाही. त्यांनी सांगवी गटातून विजय मिळवला. सहकार पॅनल केवळ एक जागा काबीज करण्यात यशस्वी ठरला.

रक्तरंजित संध्याकाळ! पार्टीत गॅंगवार, अंदाधुंद गोळीबारात 12 जणांचा मृत्यू

अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारावेळी चंद्रराव तावरेंना वयावरुन लक्ष्य केलं होतं. ‘आता तुमचं वय झालंय, 85 वर्षे झाले तरी थांबायला तयार नाही’, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. तर चंद्रराव तावरे यांनी देखील अजित पवारांना याच भाषेत प्रत्युत्तर दिलं होतं. ‘राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार मुख्यमंत्री व्हायचे सोडून कारखान्याचे चेअरमन व्हायला निघाले आहेत. त्यांनी तालुक्याची प्रतिष्ठा कमी केली. उपमुख्यमंत्री मीच, मंत्री मीच, आमदार मीच, कारखान्याचा चेअरमन मीच… सगळीकडे मीच’, असा टोला चंद्रकांत तावरे यांनी लगावला होता.

वयाच्या मुद्द्यावरुन टीका

अजित पवारांनी निवडणुकीत 85 वर्षांच्या चंद्रराव तावरे यांच्यावर वयाच्या मुद्द्यावरुन टीका केली होती. अजितदादांच्या नीळकंठेश्वर पॅनेलने याच मुद्द्याचे भांडवल करायचा प्रयत्न केला होता. परंतु सहकार पॅनेलने या टीकेला अभिमानाच्या भावनेत बदलल्याचं समोर आलं. सर्व पॅनेलमध्ये वयाने सर्वात वयोवृद्ध असणाऱ्या चंद्रराव तावरे यांना मतदारांनी कौल दिलाय.

हिंदी पहिल्या इयत्तेपासून सक्तीची नको; ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे याचं स्पष्ट मत

अजित पवार या निवडणुकीसाठी नऊ दिवस माळेगावमध्ये तळ ठोकून होते. या कारखान्याच्या निवडणुकीवरून सहकार पॅनेलच्या रंजन तावरे यांनी अजित पवारांवर टीका केलीय. सत्तेचा पुरेपुर गैरवापर करत सर्व शासकीय यंत्रणाचा वापर केला. दबावतंत्राद्वारे माळेगांवच्या सभासदांना वेठीस धरलं, असा आरोप देखील तावरे यांनी केलाय. त्यांचा या निवडणुकीत 362 मतांनी पराभव झाला.

 

follow us