Malegaon Sugar Factory : माळेगाव कारखाना निवडणुकीत कॉंटे की टक्कर; अजितदादांचा वरचष्मा?

Malegaon Sugar Factory : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या (Malegaon Sugar Factory ) निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं असतानाच सायंकाळी सातपर्यंत मोजलेल्या मतांनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचीच बाजी असल्याचं दिसून येत आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नीळकंठेश्वर पॅनेलचे पाच तर तावरे गटाच्या सहकार बचाव पॅनेलचा एक उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
…तर मी माझे शब्द मागे घेतो; वारीबाबत केलेल्या वक्तव्यावर अबू आझमींचा माफीनामा!
सायंकाळी सातपर्यंत माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेच्या मतमोजणीत अनुसूचित जाती जमाती, इतर मागास, भटक्या जाती जमाती आणि महिला राखीव प्रवर्गातील जवळपास आठ हजार मते मोजण्याचं काम पूर्ण झालं असून उर्वरित आठ हजार मतांची मोजणी अद्याप बाकी असल्याचं सांगितलं जात आहे. ही मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच चुरशीच्या लढतीत कोणी बाजी मारलीयं? याची स्पष्टता येणार आहे.
माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे ‘ब’ मतदारसंघातून सकाळीच विजयी झाले आहेत. अजित पवार यांनी 101 मतांपैकी 91 मते घेतली आहेत. तर त्यांच्या विरोधातील उमेदवार भालचंद्र देवकाते यांना 10 मतांवरच समाधान मानावं लागलंय. अजितदादांचा पॅनल एका विजयासह पाच जागांवर आघाडीवर आहे तर तावरे गटाचा उमेदवार महिला प्रवर्गातून आघाडीवर आहे. महिला राखीव गटातून तावरे गटाचा एक उमेदवार 63 हजार मतांनी आघाडीवर आहे.
हिंदी भाषा धोरणावर मनसे प्रमुख राज ठाकरेंशी बोलणार का?, मंत्री दादा भुसे यांनी काय दिलं उत्तर?
ब वर्ग प्रवर्ग
अजित अनंतराव पवार : 91 मते (विजयी)
भालचंद्र बापूराव देवकाते (चंद्रराव तावरे गट) : 10 मते (पराभूत)
इतर मागास प्रवर्ग
नितीन वामनराव शेंडे (अजित पवार गट) : 4120 (नीळकंठेश्वर पॅनेल आघाडीवर)
रामचंद्र नाळे (चंद्रराव तावरे गट) : 3644 (सहकार बचाव पॅनेल)
भरत बनकर (तुतारी) : 437 (शरद पवार गट)
अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ
रतनकुमार भोसले (अजित पवार गट) : 4117 (नीळकंठेश्वर पॅनेल आघाडीवर)
बापूराव गायकवाड (चंद्रराव तावरे गट) : 3717 (सहकार बचाव पॅनेल)
राजू भोसले श्रीरंग (तुतारी) : 417 (शरद पवार गट)
भटक्या जाती जमाती प्रवर्ग
विलास ऋषिकांत देवकाते (अजित पवार गट) : 4269 (नीळकंठेश्वर पॅनेल आघाडीवर)
सूर्याची तात्यासाहेब देवकाते (चंद्रराव तावरे गट) : 3288 (सहकार बचाव पॅनेल)
ज्ञानदेव बुरुंगले (तुतारी) : 566 (शरद पवार गट)
महिला राखीव प्रवर्ग
संगीता बाळासाहेब कोकरे (अजित पवार गट) : 2161 (नीळकंठेश्वर पॅनेल आघाडीवर)
राजश्री कोकरे (चंद्रराव तावरे गट) : 2022 (सहकार बचाव पॅनेल आघाडीवर)
ज्योती मुलमुले (अजित पवार गट) : 1959 (नीळकंठेश्वर पॅनेल पिछाडीवर)
दरम्यान, अद्याप माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा अंतिम निकाल स्पष्ट झालेला नसून अद्यापही मतमोजणी सुरुच आहे. राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय. त्यामुळे या निवडणुकीत कोणाच्या पॅनेलचा विजय होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.