माळेगाव कारखाना निवडणूक, अजित पवारांना धक्का, महिला गटात तावरे गटाने मारली बाजी

Malegaon Factory Election Result : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीचे निकाल (Malegaon Factory Election Result) जाहीर होत असून सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मोठा धक्का बसला आहे. महिला गटातून तावरे गटाच्या सहकार बचाव पॅनेलच्या उमेदवार राजश्री कोकरे (Rajshree Kokare) आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. ही निवडणूक चौरंगी झाल्याने कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे अनेक उमेदवार आघाडीवर असल्याची देखील माहिती समोर आली आहे. तर या निवडणुकीत शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बळीराजा सहकार बचाव पॅनेलला मोठा धक्का बसला असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील एकूण 7,722 मतदानापैकी शरद पवारांच्या उमेदवाराला फक्त 251 मतं मिळाली आहे. तर इतर मागास प्रवार्गामध्ये अजित पवार गटाचे उमेदवार आघाडीवर आहे.
सध्या इतर मागास प्रवर्गाची 2.680 मते मोजून झाली असून त्यामध्ये अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनलचे नितीन शेंडे 197 मतांनी आघाडीवर आहे. तर माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत ‘ब वर्ग गटातून’ उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झाले आहेत. 102 पैकी 101 मतं वैध होती, यातील अजित पवारांना 91 मतं मिळाली आहेत. सहकारी संस्था या गटासाठी मतदान करतात. या निवडणूकीसाठी 22 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती.
ठाकरेंना धक्का, माजी आमदार महादेव बाबर यांनी हाती बांधले घड्याळ
या निवडणुकीमध्ये अजित पवारांचे निळकंठेश्वर पॅनेल, शरद पवार यांचे बळिराजा सहकार बचाव पॅनेल आणि भाजप नेते चंद्रराव तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनेल आणि एक अपक्ष पॅनेल असे या चार पॅनेल या निवडणुकीच्या रिंगणात होते.