Pune News : पुण्यातील रिक्षाचालकांसाठी आरटीओकडून (Pune RTO) एक मोठा निर्णय घेण्यात आलायं. रिक्षाचालकांना मार्गावर सेवा पुरवताना आता पांढरा शर्ट आणि खाकी पॅंट असा गणवेश बंधनकारक असणार आहे. तसेच गणवेशासोबत ओळखपत्र प्रदर्शित करणेही बंधनकारक असणार आहे. गणवेश, ओळखपत्र नसल्यास रिक्षाचालकांवर आरटीओच्या पथकाकडून कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात परिपत्रक आरटीओकडून काढण्यात आलंय.
मराठवाड्यावर पुन्हा पाणी संकट; तब्बल १५२ प्रकल्प कोरडे ठाक, जलसंपदा विभागाची माहिती काय?
शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रिक्षाचालकांची ओळख पटावी, त्यासाठी महाराष्ट्र कायदा वाहन नियम 1989 चे नियम 21 पोटनियम 18 मध्ये रिक्षाचालकांनी प्रवाशांना सेवा पुरवताना गणवेश, ओळखपत्र बंधनकारक आहे. काही रिक्षाचालक या नियमांचे पालन करीत नाहीत.
श्रीरामपुरात काँग्रेसला धक्का! माजी नगराध्यक्षांसह 10 जणांच्या हाती कमळ; विखेंची खेळी यशस्वी
रिक्षाचालक पांढरा शर्ट आणि खाकी पॅंट असा गणवेश परिधान करीत नाहीत, असं आरटीओ कार्यालयाच्या निदर्शनास आलंय. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी पत्रक प्रसिद्ध केलंय. रिक्षाचालकांनी नियमांचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचं भोसले यांनी पत्रात म्हटलयं.
सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी जीवावर उदार; स्मशानभूमीत यमाचा फोटो समोर ठेऊन आंदोलन
पुण्यात मोटार वाहन कायद्यातील विविध नियमांचा भंग वाहनचालकांकडून केला जात असल्याचं दिसून येत आहे. या वाहनचालकांविरोधात आरटीओच्या वायुवेग पथकांमार्फत सातत्याने कारवाई केली जात असते. आता रिक्षाचालकांचा गणवेश, ओळखपत्र आणि वैध कागदपत्रांची तपासणी मोहिम राबवण्यात आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे आता या मोहिमेत नियमभंग केल्यास वाहनचालकांविरोधात कारवाई केली जाणार आहे.