सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी जीवावर उदार; स्मशानभूमीत यमाचा फोटो समोर ठेऊन आंदोलन

सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी जीवावर उदार; स्मशानभूमीत यमाचा फोटो समोर ठेऊन आंदोलन

Farmers Protest for general loan waiver in crematorium Jalana : विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि युती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं अश्वासन दिलं होतं. मात्र अद्याप देखील या अश्वासनांची पुर्तता करण्यात आलेली नाही. यावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जात आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यात आता शेतकऱ्यांकडून आंदोलनं देखील केली जात आहेत.

मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, कारण गुलदस्त्यात

यामध्येच आता जालना जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी एका शेतकऱ्याने स्मशानभूमीत स्मशान आंदोलन सुरू केल आहे. जालन्यातील बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथील स्मशानभूमीत आंदोलन सुरू करण्यात आल.यमाचा फोटो समोर ठेवून तिरडीवर झोपून हे अनोख आंदोलन सुरू करण्यात आलय. राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी ही प्रमुख मागणी या आंदोलकाची आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवात 41 चित्रपटांची मेजवानी; आशिष शेलार यांची घोषणा

कारभारी मसलेकर असे या आंदोलकाच नाव आहे. सध्या बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण गावातील स्मशान भूमीमध्ये हे अनोख आंदोलन सुरू आहे..याआधी म्हसलेकर यांनी विहीरीत खाट हवेत लटकवून त्या खाटेवर बसून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन केलं होतं.आता पुन्हा म्हसलेकर यांनी आंदोलन सुरू केलय.

कर्जमाफीच्या विधानावर कृषीमंत्री कोकाटेंचा युटर्न…

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत बोलताना राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकोटे (Manikrao Kokate) यांनी शेतकऱ्यांना सुनावलं होतं. यासंदर्भातील व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. या प्रकरणी बोलताना आता कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केलीयं. कर्जमाफीबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत असल्याच कोकाटेंनी स्पष्ट केलंय.पुढे बोलताना कोकाटे म्हणाले, काल अनावधानाने आणि मस्करीने केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मानसन्मान दुखावला गेला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं माणिकराव कोकाटे म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube