Download App

Maratha Protest : आंदोलनाचे लोण पुण्यापर्यंत, नवले पुलावर जाळपोळ; वाहतूक विस्कळीत

  • Written By: Last Updated:

पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील विविध भागात आंदोलक आक्रमक झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. काल (दि.30) बीडसह मराठवाड्यात अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या असून, आता याचे लोण पुण्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी शहरातील नवले पुलावर (Nawale Bridge) टायरची जाळपोळ करण्यात आली आहे. आंदोलकांनी सातऱ्याकडून मुंबईकडे आणि साताऱ्याकडे जाणारी वाहतूक रोखून धरली आहे. यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. सध्या या ठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाला असून, वाहनांच्या सुमारे सहा ते सात किमीपर्यंत रांगा लागल्या आहेत.  ( Maratha Protest On Pune Nawale Bridge Update News)

‘पंतप्रधानांपुढे प्रश्न मांडा अन्यथा राजीनामे द्या’ : मोदी कॅबिनेटमधील महाराष्ट्राच्या मंत्र्यांकडे ठाकरेंची मागणी

दोन्ही मार्गांवर वाहनांच्या मोठ्या रांगा

पुण्यातील नवले पुलावर आंदोलकांनी आक्रमक होत टायरची जाळपोळ करत जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. जाळपोळीच्या घटनेमुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून, साताऱ्याकडे आणि मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या  ॉ6 ते 7 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लगाल्या असून, ही कोंडी सोडण्याचं काम पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे. मात्र, आंदोलकांमुळे ही कोंडी सोडवण्यात अडचणी येत आहेत.

बीड, धाराशिवमध्ये संचारबंदी

राज्यात मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाने (Maratha Reservation) हिंसक वळण घेतले असून. मराठवाड्यात आरक्षणाचे आंदोलन अधिक उग्र झाले आहे. काल (दि. 30) बीड जिल्ह्यात आमदारांच्या घरांसह कार्यालय पेटवून देण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. तसेच मोठ्या प्रमाणात एसटी बसेसची तोडफोड करण्यात आली होती. वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये अखेर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरू नये यासाठी येथील इंटरनेट सेवा उद्यापर्यंत (दि.1) बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीड जिल्ह्यासह धाराशिवमध्येही आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला असून, येथील परिस्थितीबघात येथेदेखील संचारबंदीचा निर्णय घेण्यात आल आहे. धाराशिवमध्येही हिंसक घटना बघता स्थानिक प्रशासनाने येथे संचार बंदी लावण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.

Maratha Reservation : राजीनामा सत्र सुरुच! आतापर्यंत चार आमदार अन् दोन खासदारांनी उपसलं हत्यार

अनेक आगारांच्या सेवा बंद 

मराठवाड्यासह राज्यातील काही भागात आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना समोर आल्या आहेत. यात सर्वाधिक नुकसान हे एसटी महामंडळाच्या बसेसचं झाले आहे. त्यामुळे वाढत्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून महामंडळाने अनेक आगारांमधील बस सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे गावाला जाणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून, पुणे, नागपूरसह राज्यातील अनेक भागांतून मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस रद्द करण्यात आल्या आहेत.

गेल्या 3-4 दिवसांपासून मराठवाड्यातील परभणी, धाराशीव, लातूर, जालना, नांदेड या जिल्ह्यातील सर्व एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तर, बीड, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर जिल्ह्यातील 36 आगाराची वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातून मराठवाड्यात जाणाऱ्या 70 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

जरांगेंना मदत करणं आमदार पुत्राच्या अंगलट; ‘फोन पे’ वरून येणाऱ्या चिल्लर पैशांमुळे वैतागला

मराठा समाज आक्रमक

मराठा आरक्षण आंदोलनाची ज्योत आता चांगलीच पेटली आहे. महिनाभरात आरक्षण देऊ असे आश्वासन दिल्यानंतर त्याची पूर्तता न झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरु केले आहे. राज्यात आगामी काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. मात्र मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असल्याने गावोगावचे सर्वच पक्षांतील मराठा समाजाचे कार्यकर्ते दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत आहेत. आरक्षणासाठी वेगवेळ्या स्वरूपाची आंदोलने करणारे कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरू लागले आहे.

Tags

follow us