पुणेः मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा बोलविता धनी कोण आहे? निवडणुकांच्या तोंडावर जातीय वाद पेटविण्यासाठी त्यांच्या आडून दुसरे कोणीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे का? असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांनी उपस्थित केला आहे. त्याला आता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी थेट उत्तर दिले आहे.
राज ठाकरेंचा 15 दिवसांत यु-टर्न : प्रामाणिक वाटणाऱ्या जरांगेंच्या आंदोलनातून आता ‘राजकारणाचा वास’
पुण्यातील दौंड येथे पत्रकारांशी बोलताना जरांगे म्हणाले, राज ठाकरे यांनी आंदोलनामागे कोण आहे हे शोधून काढावे आणि लवकर स्पष्टपण करावे. आम्हाला पण एेकायचे आहे. या पाठीमागे कोण आहे ते. सगळ्यांनी शोधले आहे. तुम्ही पण शोधावे आणि आम्हाला सांगावा. त्यानंतर तुम्ही म्हणतान तो शब्द मागे घेऊ. फक्त तुम्ही शोधा, आम्हाला काय शोध लागला नाही, असा टोलाही जरांगे यांनी लगावला आहे.
<a href=”https://letsupp.com/maharashtra/north-maharashtra/nilesh-lanka-attends-mla-ram-shindes-diwali-faral-program-104831.html”>आमदार राम शिंदेच्या दिवाळी फराळ कार्यक्रमा निलेश लंकेची हजेरी, चर्चांना उधाण
मराठा आरक्षणाच्या आंदोलनामागे फफ्त मराठा समाज आहे. मराठा लेकरांचे कल्याण होऊ लागले आहे. आरक्षणाबाबत खोटे आरोप करून खोट्या पुड्या सोडल्या जात आहे. मराठा आरक्षण मिळणार आहे आणि ते आम्ही मिळविणार आहे. मराठा समाज आता कोणाचे एेकणार नाही, असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे.
छगन भुजबळांनी किती ही सभा घ्याव्यात…
छगन भुजबळ हे राज्यात सभा घेत आहे. त्यावरून मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांना टोला लगावला आहे. छगन भुजबळ यांना काय सभा घ्यायच्या आहेत. त्या घेऊ द्या. आमचा काही प्रॉब्लेम नाही. ते मंत्री असून, त्यांच्यावर राज्याचे पालकत्व आहे. गोर-गरिबांनी विरोध करत नाही. त्यांनी किती सभा घेतल्या तरी 24 डिसेंबरला मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणार असल्याचा निर्धारही जरांगेंनी बोलून दाखविला आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
मूळात या प्रकारचे कोणतही आरक्षण कधीही मिळणार नाही हे मी त्यांच्या समोर सांगून आलो होतो. मी कोणतीही नवीन गोष्ट सांगत नाही. आता हे जरांगे पाटील आहेत की त्यांच्या मागून कोणीतरी बोलत आहे, ज्याच्यातून जातीयवादाच्या माध्यमातून महाराष्ट्रात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी सुरु होत आहेत, हे काही मला इतके सरळ चित्र दिसत नाही. पण कालातंराने कळेल की यामागे कोण आहे? असे म्हणत त्यांनी जरांगे यांच्या आंदोलनातून राजकारण करण्यात येत असल्याचा आणि जातीय वाद भडकविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे.