Maratha Reservation : मराठा आरक्षणावरुन खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale)यांनी राज्यातील शिंदे, फडणवीस, अजितदादा सरकारला (Shinde, Fadnavis, Ajitdada Govt)घरचा आहेर दिला आहे. मराठा आरक्षणाचं (Maratha Reservation)घोंगडं जास्त दिवस भिजत ठेवलं तर ते वास मारणारच, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी लगावला आहे. त्यांनी पुणे विभाग आढावा बैठकीला उपस्थिती दर्शवली, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
टीव्ही लावला की नको त्याचं तोंड पाहावं लागतं, मंत्री विखेंचा संजय राऊतांवर घणाघात…
यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले की, इतर राज्यांनी राज्य पातळीवर जसं आरक्षणाची टक्केवारी वाढवण्याचा निर्णय घेतला, त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला तर हा प्रश्न सहज सुटण्यासारखा आहे, असेही यावेळी खासदरा उदयनराजे भोसले म्हणाले.
Hindu Tan-Man Song: ‘मैं अटल हूं’मधील ‘हिंदू तन-मन’ नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
पत्रकारांनी विचारले की, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)हे 20 जानेवारीला मुंबईमध्ये (Mumbai)आंदोलन करणार असल्याचं म्हणत आहेत. त्यावर खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, एक लक्षात घ्या की, जास्त दिवस घोंगडं भिजत ठेवलं तर वास मारायला लागतंच. जास्त दिवस एखाद्याकडं दुर्लक्ष केलं तर त्यांना चीड येणारच, असेही यावेळी उदयनराजे म्हणाले.
सरकारकडून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडं दुर्लक्ष केल्यामुळे आता ते अधिक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आरक्षणाची मर्यादा 70 टक्क्यांपर्यंत वाढवली तर हा प्रश्न त्याच ठिकाणी संपणार आहे. त्यामुळे तज्ज्ञ लोकांनी बसून यावर तोडगा काढला पाहिजे, असेही यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाचा निर्णय 20 जानेवारीपर्यंत घ्यावा अन्यथा आपल्या नियोजित कार्यक्रमाप्रमाणे दोन कोटी मराठा बांधव हे अंतरवाली सराटीपासून मुंबईकडे मोर्चा काढणार असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सांगितले आहे. त्यामुळे हा मोर्चा मुंबईमध्ये धडकल्यास राज्य सरकारची मोठी गोची होणार आहे.