टीव्ही लावला की नको त्याचं तोंड पाहावं लागतं, मंत्री विखेंचा संजय राऊतांवर घणाघात…

Radhakrishna Vikhe Sanjay Raut

Ahmednagar: शिवसेना कोणाची? यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar)यांनी निकाल दिला आहे. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी भाजपवर टीका केली आहे. याला प्रत्युत्तर देताना मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe)यांनी देखील राऊतांवर घणाघाती टीका केली आहे. इथं रोज सकाळी टीव्ही लावला की, नको त्याचं तोंड पाहावं लागतं. त्यांच्या या वाचाळपणामुळे ठाकरेंच्या सेनेची अब्रू गेली आहे. तसेच त्यांच्या या वक्तव्यांमुळे उरली सुरलेली ठाकरेंची सेना देखील संपू लागली आहे. अशा शब्दात मंत्री राधाकृष्ण विखे यांनी नामोल्लेख टाळत खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

ना शाहरुख…ना रजनीकांत…ना प्रभास, ‘या’ अभिनेत्याने बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला कमावला!

नगर शहरात पक्षाच्या एका कार्यक्रमाला मंत्री राधाकृष्ण विखे यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी मंचावरुन त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी मंत्री विखे म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ऐतिहासिक निर्णय दिला आहे. यामुळे आता राज्यातील महायुती सरकार आणखी मजबुतीने काम करण्यास सुरुवात करणार आहे. खऱ्या अर्थाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार हे एकनाथ शिंदे हे आहेत, यावर शिक्कमोर्तब झाले आहे.

विरोधकांचं सर्वोच्च न्यायालयालाही सल्ले देण्याचं काम; CM एकनाथ शिंदेंनी डिवचलं

तसेच यावेळी त्यांनी सरकारवर नेहमी निशाणा साधणाऱ्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील जोरदार घणाघात केला. यावेळी विखे म्हणाले की, आपल्या राज्यामध्ये ज्योतिषींची संख्या वाढली आहे. रोज नवीन एक ज्योतिषी येऊन सांगायचं की, हे सरकार पडणार, या तारखेला पडणार, त्या तारखेला पडणार… मी सांगितलं तुम्ही काय त्या पोपट घेऊन फिरणाऱ्या ज्योतिषीचं ऐकता. तो ज्योतिषी पोपट घेऊन फिरुन त्याचं पोट भरतोय असं म्हणतच त्यांनी राऊतांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला.

इथं रोज सकाळी टीव्ही लावला की नको त्याचं तोंड पाहावं लागतं. त्यांच्या या वाचाळपणामुळे ठाकरेंच्या सेनेची अब्रू गेली आहे. तसेच त्यांच्या या वक्तव्यांमुळे उरली सुरलेली ठाकरेंची सेना देखील संपू लागली आहे. तसेच यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यावर देखील टीका केली.

एखाद्या पक्षाचे 40-40 आमदार जातात. तुम्ही साधे मुख्यमंत्री आणि पक्ष वाचवण्यासाठी समोर आले नाही. ते जाणता राजाच्या सल्ल्याने चालतात. एकमेकांना सल्ला दिल्याने दोघांचेही पक्ष संपले आहेत, असेही यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले.

follow us