उद्धव ठाकरेंच्या अडचणी थांबेनात! पक्ष गेला, धनुष्यबाण गेलं, आता मशालही जाणार?
Uddhav Thackeray : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या आमदार अपात्रता प्रकरणी (Mla Disqualification Case Verdict) काल (दि. 10 जानेवारी) विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिला. एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना (Shiv Sena) असल्याचा निर्वाळा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. या निकालामुळं उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray ) मोठा धक्का बसला असून ठाकरे गटाच्या नेत्यांकडून संपाप व्यक्त केला जात आहे. अशातच आता आणखी एक मोठा धक्का ठाकरे गटाला बसण्याची शक्यता आहे. मशाला चिन्हावर समता पक्षाने (Samata Party) दावा सांगितला.
जोरदार भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली राजधानी; रिश्टर स्केलवर 6.1 तीव्रतेची नोंद
शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नाव निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिलं होतं. तर मशाल हे नवं चिन्ह ठाकरे गटाला दिल होतं. त्यानंतर विधान परिषदेची निवडणूकही ठाकरे गटाने मशाल चिन्हावर लढवली होती. दरम्यान, निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे निवडणुक चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षांनीही मूळ शिंदेंचीच असल्याचं शिक्कामोर्तब केलं. त्यामुळं उद्धव ठाकरे गटाला धक्का बसला. त्यानंतर आता समता पक्षानेही निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला दिलेल्या मशाा चिन्हावर आपला दावा केला आहे. त्यामुळं ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हानंतर आता ठाकरेंच्या हातून निवडणूक मशाल चिन्हही जाण्याची शक्यता आहे.
एकमेकांना सल्ले दिल्याने दोघांचंही वाटोळं झालं; विखेंची ठाकरेंसह पवारांवर सडकून टीका
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार समता पक्षाला मशाल निवडणूक चिन्हासाठी अर्ज करण्याचा अधिकार असल्याचा दावा समता पक्षाने केला आहे. 4 जानेवारी 2024 रोजी निवडणूक आयोगाने नोंदणीकृत परंतु मान्यता नसलेल्या पक्षांना निवडणूक चिन्ह देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे समता पक्ष आता चिन्हासाठी अर्ज करणार आहे.
राजकीय पक्षांना आजपासून (11 जानेवारी 2024) पक्ष चिन्हे दिली जातील, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. तसेच समता पक्षाने सर्व अटी पूर्ण केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून मशाल निवडणूक चिन्ह काढून घेतले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, याआधीही समता पक्षाने मशाल निवडणूक चिन्हावर दावा केला होता. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल निवडणूक चिन्ह दिल्यानंतर समता पक्षानेही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे आता ठाकरेंकडे मशाल निवडणूक चिन्ह राहणार की जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल