एकमेकांना सल्ले दिल्याने दोघांचंही वाटोळं झालं; विखेंची ठाकरेंसह पवारांवर सडकून टीका

एकमेकांना सल्ले दिल्याने दोघांचंही वाटोळं झालं; विखेंची ठाकरेंसह पवारांवर सडकून टीका

Ahmednagar News : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असल्याचा निर्माण दिला. यावर बोलताना राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe) यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर कडाडून टीका केली आहे. एखाद्या पक्षाचे 40-40 आमदार जातात तुम्ही साधे मुख्यमंत्री आणि पक्ष वाचवण्यासाठी समोर आले नाही ते जाणता राजाच्या सल्ल्याने चालतात एकमेकांना सल्ला दिल्याने दोघांच्याही पक्षांचे वाटोळं झालं असल्याची टीका राधाकृष्ण विखे यांनी केली आहे.

‘जलसिंचन, शिखर बॅंक घोटाळ्यात मोदी, फडणवीस अजितदादांना वाचवतात’; शालिनीताईंचा आरोप

राधाकृष्ण विखे म्हणाले, उद्धव ठाकरे कधीच मंत्रालयात, विधानसभा अध्यक्षांसमोर गेले नाहीत. आमची शिवसेना खरी असल्याचा दावा ते करीत होते. ज्यांना आपला पक्ष वाचवता आला नाही, आमदार सोडून जातात ही छोटी घटना नाही. उद्धव ठाकरे ज्येष्ठ नेते जे, स्वत:ला जाणता राजा समजतात त्यांच्या इशाऱ्यावर ते कठपुतलीसारखे नाचत असल्याची खोचक टीका विखेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

आता सरकार गेले दोघांचेही पक्ष गेले. दोघेही एकमेकांना सल्ले देतात. सल्ले देता-देता दोघांचंही वाटोळ झालं. आता शिल्लक काय राहिलं
सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत त्यासाठी सर्वोच्च न्यायालय सक्षम आहे. कालच्या निर्णयामुळे सिंदिग्ता होती. नार्वेकरांनी दोन्ही गटाच्या आमदारांना अपात्र केलं नाही, याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे असल्याचंही विखे पाटील म्हणाले आहेत.

भाजपने डोळे दाखवताच अजितदादा नरमले; चंद्रकांतदादांनी प्रस्तावित केलेली सर्व कामे मंजूर

देशभराचं लक्ष लागून राहिलेल्या अपात्र आमदार प्रकरणाचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधी मंडळात अपात्र आमदार प्रकरणाचा निकाल वाचून दाखवला आहे. या निकालात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट या दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवण्यात आले आहेत. या निकालामुळे दोन्ही गटाला दिलासा मिळाला आहे. तर एकनाथ शिंदे गटाचीच शिवसेना खरी असल्याचाही निकाल राहुल नार्वेकरांनी दिला आहे. त्यामुळे हा उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्काच असल्याचं मानलं जात आहे.

दरम्यान, या प्रकरणी विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली जात आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राहुल नार्वेकरांच्या टीकेवरुन निकाल आधीच ठरला असल्याचा आरोपही केला असल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांच्या टीकेनंतर आज राधाकृष्ण विखे यांनी शरद पवारांसह उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube