Download App

मी फक्त भावकीसाठी नाही तर गावकीसाठी काम करतो…; सुनील शेळकेंचा भेगडेंवर हल्लाबोल

काही लोक केवळ भावकीचा विचार करतात. मात्र, आम्ही गावकीचा विचार करून तालुक्यातील प्रत्येक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला,

  • Written By: Last Updated:

Sunil Shelke : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेच्या फैरी झडत आहेत. आता अजित पवार गटाचे उमेदवार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी बापू भेगडे (Bapu Bhegade) आणि बाळा भेगडे (Bala Bhegade) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. काही लोक केवळ भावकीचा विचार करतात. मात्र, आम्ही गावकीचा विचार करून तालुक्यातील प्रत्येक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला, असं ते म्हणाले.

Video: जय शाहला बुध, गुरू अन् शुक्राचा अध्यक्ष करा; गावच्या मुलांचा उल्लेख करत ठाकरेंचं थेट चॅलेंज 

सुनील शेळके यांनी पवनानगर, शेवती वसाहत, कडधे, ओझर्डे, राऊतवाडी, बौर या गावांचा जनसंवाद दौरा केला. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, आरपीआय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या अध्यक्षा दीपाली गराडे, ज्येष्ठ नेते गणेश आप्पा ढोरे, विठ्ठल शिंदे, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके आदींची उपस्थिती होती.

पवन मावळात आमदार शेळके यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, काही लोक केवळ भावकीचा विचार करतात. मात्र, आम्ही गावकीचा विचार करून तालुक्यातील प्रत्येक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला, आपण नेमहीच सर्वांना बरोबर घेऊन पुढं जाण्याचा भूमिकेतून काम करतो. आपण कधीच फक्त भावकीचा विचार केला नाही, असं शेळके यांनी सांगितलं.

मी भावकीसाठी तर गावकीसाठी…
शेळके म्हणाले, आमदाराचे काम फक्त जनतेसाठी काम करणे असते. स्वत:चे घर न भरता जनतेच्या मागण्या पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. या निवडणुकीच्या काळात जिथे कोण कोणाचे आहे, हेच कळत नाही. तिथं तुमच्यासारखी मायबाप जनता माझ्याागे ठामपणे उभी आहे. मी भावकीसाठी नाही तर गावकीसाठी आहे. तुमच्या अपेक्षा मी पूर्णच करत आलोय, यापुढही करीन, असं शेळके म्हणाले.

तुळजापुरमध्ये मविआत दोस्तीत कुस्ती; ‘समाजवादी’च्या उमेदवारीने मैत्रीपूर्ण लढत 

ओझर्डे गावात सव्वा दोन कोटींची विकासकामे
दरम्यान, धनंजय ओझरकर म्हणाले की, आमदार शेळके यांनी ओझर्डे गावाला सुमारे सव्वा दोन कोटींचा निधा दिला. याशिवाय दोन लाख रुपयांची खडी व वैयक्तिक मदत देण्यात आली. सुनील अण्णांमुळे गावाच्या विकासाला गती मिळाली असल्याचे ते म्हणाले.

मावळच्या विकासाचे मॉडेल जगासाठी पथदर्शक
बौर गावातील बाळू मोहोळ म्हणाले, मावळच्या विकासाचे मॉडेल संपूर्ण जगासाठी पथदर्शक आहे. त्यामुळे तालुक्यातील सामान्य माणूस आमदारांच्या मागे आहे. त्यामुळे ते निश्चितच बहुमताने निवडून येतील, असा विश्वास आहे. प्रत्येकाने एक नंबर बटण दाबून त्यांना निवडून आणावे, असं आवाहनही मोहोळ यांनी केलं.

राऊतवाडीत 10 कोटींचा विकास निधी
आमदार शेळके यांचे राऊतवाडीत जंगी स्वागत झाले. यावेळी माजी सरपंच पोपटराव राऊत, नामदेव राऊत, काळूराम राऊत, सोपान करके, भगवान लगड, शंकर लगड, आदेश लगड यांच्यासह अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महिलांचीही लक्षणीय उपस्थिती होती. आमदारांनी गावातील विकासकामांसाठी 10 कोटींचा निधी दिला. गावातील मंदिराचे काम 20 लाखात पूर्ण झाले. आमदारांनी कोणताही भेदभाव न करता सर्वांना मदत केली आहे, आदेश लगड म्हणाले.

follow us