तुळजापुरमध्ये मविआत दोस्तीत कुस्ती; ‘समाजवादी’च्या उमेदवारीने मैत्रीपूर्ण लढत

तुळजापुरमध्ये मविआत दोस्तीत कुस्ती; ‘समाजवादी’च्या उमेदवारीने मैत्रीपूर्ण लढत

Tuljapur Elections : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर विधानसभा मतदारसंघात यंदा लढतीनं (Maharashtra Elections) वेगळंच वळण घेतलं आहे. याला कारण ठरलं आहे महाविकास आघाडीतलं राजकारण. या मतदारसंघात आघाडीत फूट पडली आहे. काँग्रेसने धीरज पाटील यांना उमेदवारी दिलेली असतानाही मविआतील घटक पक्ष समाजवादी पार्टीचाही उमेदवार (Samajwadi Party) रिंगणात उतरला आहे. त्यामुळे या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत निश्चित झाली आहे. महायुतीने विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी दिली आहे. या दोन मुख्य उमेदवारांसह आणखी २३ उमेदवार रिंगणात आहेत.

तुळजापूर मतदारसंघात एकूण ५१ जणांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारीची मुदत संपली तेव्हा २३ जणांचे अर्ज शिल्लक राहिले होते. मधुकरराव चव्हाण यांनी निवडणुकीतून माघार घेतली. चव्हाण हे पाच वेळा निवडून आले आहेत. त्यांनी यंदा अपक्ष अर्ज दाखल केला होता. मात्र, नंतर त्यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे महायुतीचे राणा जगजितसिंह पाटील आणि मविआचे धीरज पाटील यांच्यात थेट लढत होईल असेच चित्र होते. परंतु, आघाडीतील समाजवादी पक्षानेही येथे उमेदवार देत निवडणुकीत रंगत आणली आहे.

तुळजापूर पर्यटनस्थळ ते धाराशिव रेल्वेमार्ग; राणा जगजितसिंह पाटलांनी विकासाचा आराखडा मांडला

समाजवादी पक्षाने देवानंद रोचकरी यांना तिकीट दिलं आहे. त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. जोरदार शक्तिप्रदर्शन करत त्यांनी अन्य उमेदवारांना विचार करण्यास  भाग पाडलं आहे. २०१४ मध्ये रोचकरी मनसेच्या तिकीटावर मैदानात होते. यावेळी त्यांनी चांगली मते घेत आपली चुणूक दाखवून दिली होती. आताही पूर्ण ताकदीने त्यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता वाढली आहे.

मैत्रीपूर्ण लढत होणार असली तरी आघाडीच्या नेत्यांचं टेन्शन मात्र वाढलं आहे. समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रताप होगाडे यांनी प्रदेश महासचिव अनिस अहमद यांना याबाबत पत्रही पाठवलं आहे. त्यामुळे या मतदारसंघातील मैत्रीपूर्ण लढत निश्चित झाली आहे. रोचकरी यांच्या व्यतिरिक्त प्रहार जनशक्ती पक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्षानेही या मतदारसंघात उमेदवार दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य अशोक जगदाळे यांनी महाविकास आघाडीची उमेदवारी मिळवण्यासाठी वर्षभरापासून प्रयत्न केले होते. परंतु, त्यांनाही माघार घ्यावी लागली. त्यामुळे त्यांच्या समर्थकांत चांगलीच नाराजी पसरली आहे. तिसऱ्या आघाडीचे अण्णासाहेब दराडे यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यांना प्रहार जनशक्ती पक्षाने तिकीट दिलं आहे.

Video : तुळजापूरसह जिल्ह्याचा कायापालट करणार; उमेदवारी जाहीर होताच काय म्हणाले राणा पाटील?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube