पुणे प्रकरणानंतर अहिल्यानगरच्या पांगरमलची आठवण ताजी; विषारी दारूने घेतला होता 16 जणांचा जीव

Pune case poisonous liquor पुण्यात विषारी दारू पिल्याने १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे अहिल्यानगरच्या पांगरमल दारुकांडाची आठवण ताजी होत आहे.

Pune Case Poisonous Liquor

Pune Case Poisonous Liquor

Memory of Ahilyanagar’s Pangarmal fresh AfterPune case poisonous liquor took lives of 16 people : पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू पिल्याने १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील पांगरमल बनावट दारुकांडाची आठवण ताजी होत आहे. या दोन्ही घटनांत मोठे साम्य आहे. पांगरमल बनावट दारूकांड राज्यभर गाजले होते.

उत्तर प्रदेशातील बेतवा नदीवरील निर्माणाधीन पूल कोसळला; 6 मजुरांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे १३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हडपसर (पुणे) व फुगेवाडी (पिंपरी-चिंचवड) येथे विषारी दारू प्यायल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. हातभट्टीच्या दारूमध्ये ‘मिथेनॉल’ नावाचे विषारी रसायन मिसळल्यामुळे ही दुर्घटना घडली. पिंपरी-चिंचवडच्या फुगेवाडीत ८ आणि पुण्यातील हडपसर परिसरात ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

FIPRESCI-India च्या टॉप-10 भारतीय चित्रपटांमध्ये ‘गोंधळ’ आणि ‘साबर बोंड’; मराठी सिनेमाचा राष्ट्रीय स्तरावर पुन्हा डंका

अशीच एक घटना अहिल्यानगर जिल्ह्यात घडली होती. अहिल्यानगर जिल्ह्यातील पांगरमल गावात घडलेल्या दोन वेगवेगळ्या गंभीर घटनांची नोंद स्थानिक इतिहासात आणि गुन्हेगारी नोंदींमध्ये आहे. १३ फेब्रुवारी २०१७ रोजी घडलेली ही घटना राज्यभरात गाजली होती. जिल्हा परिषद निवडणुकीत जेऊर गटातील पांगरमल येथे पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत दारू देण्यात आली. ही दारू बनावट तसेच विषारी दारू होती. ही विषारी दारू प्यायल्यामुळे एकूण १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या पार्टीच विषारी दारूमुळे १६ जणांचा मृत्यू झाला.

राष्ट्रवादीतील धुसफुस चव्हाट्यावर? बंद दाराआडच्या बैठकीत भुजबळांनी पार्थ पवारांना सुनावल्याची चर्चा

याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) तपास करत १९ जणांविरुद्ध न्यायालयात दोन हजार ३९६ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते. अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालय परिसरातील एका कॅन्टिनमधून ही विषारी दारू आणल्याचे आरोप झाले होते. त्यामुळे हे प्रकरण राज्यभर गाजले होते. आता पुणे जिल्ह्यात विषारी दारूमुळे १३ जणांचा मृत्यू झाल्याने पांगरमल विषारी दारू कांडाची नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

Exit mobile version