Download App

Chhagan Bhujbal : ‘होय, ओबीसींसाठी 35 वर्षांपासून मला वेड’; भुजबळांनी जरांगेंना ठासून सांगितलं

Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj jarange)आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यातील वाद अजूनही कायम आहे. जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली होती. भुजबळला वेड लागलं आहे, असे जरांगे पाटील म्हणाले होते. त्यांच्या याच टिकेवर आज भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले. भुजबळ आज पुण्यात होते. येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना भुजबळ म्हणाले, मला वेड लागलेलंच आहे. ओबीसी मागासवर्गीयांसाठी, फुले, शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाण्यासाठी वेड मला गेली 35 वर्षांपासून लागलेलं आहे. ते आता शेवटच्या श्वासापर्यंत जाणार नाही. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी जे सर्वेक्षण करण्यात येत आहे 15 दिवसांत पूर्ण करणार असंही सांगितलं जात आहे. इतक्या कमी वेळात जर सर्वेक्षण होणार असेल तर राज्यात जातीनिहाय जनगणनाच करून टाकावी, अशी मागणीही भुजबळ यांनी केली.

Manoj Jarange : येवल्याचं येडपट, बुजगावणं; बीडमध्ये जरांगेनी हल्लाबोल करत भुजबळांना दिल्या अनेक उपमा

मराठा आरक्षणासाठी आता मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणावरही भुजबळांनी भाष्य केलं. याबाबत आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय तो निर्णय घेतील असे भुजबळ म्हणाले. 6 जानेवारी रोजी पंढरपूरला ओबीसींचा एल्गार मेळावा आहे. त्यानंचतर 7 तारखेला मुंबईत कार्यक्रम आहे त्यामुळे नांदेडच्या सभेला मला हजर राहता येणार नाही, असे स्पष्ट करत आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीच होतील. राज्यातही महायुतीचाच मुख्यमंत्री असेल, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.

 

follow us