Chhagan Bhujbal : जरांगेंच्या नव्या आयडियांची भुजबळांनाही भुरळ; ऐकण्याचा सल्ला देत केली उपरोधिक टीका

Chhagan Bhujbal : जरांगेंच्या नव्या आयडियांची भुजबळांनाही भुरळ; ऐकण्याचा सल्ला देत केली उपरोधिक टीका

Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्याबाबतीत निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. आता ही मुदत संपण्यासाठी फक्त दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच आता मंत्री भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगेंवर उपरोधिक शब्दांत टीका केली. जरांगेंनी याआधी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात सोयरे शब्दावरून मतभेद सुरू झाले आहेत. यावरच भुजबळांनी राज्य सरकारला सल्ला देत जरांगे पाटील यांच्यावर खोचक टीका केली.

आईला ओबीसी आरक्षण मिळालं असेल तर मुलाला सुद्धा मिळालं पाहिजे, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आगे. त्यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले, माझी भूमिका अशी आहे की सरकारने आता मनोज जरांगेंचं ऐकलं पाहिजे. जे सोयरे आहेत म्हणजे पत्नीचे आई वडील आहेत त्यांनाही आरक्षण दिलं पाहिजे. त्या आईवडिलांची दुसरी जी मुलं आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे. तसेच त्या मुलांचे जे सासू सासरे आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या सासू सासऱ्यांची जी मुलं आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे.

Chhagan Bhujbal : पडळकरांवर चप्पलफेक; भुजबळ म्हणाले, दादागिरी थांबली नाही तर आम्ही..

मंत्र्यांसाठी बंगले अन् मुख्य सचिवांनाच तिकडे बसवा 

राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगेंची पुन्हा भेट घेतली होती. यावरही भुजबळांनी खोचक टीका केली. ज्यांना आरक्षण आहे त्यांच्याबरोबर काम करणारे जे आहेत त्यांचे सहकारी आहेत ते आता आरक्षणासाठी पात्र झाले आहेत म्हणून त्यांनाही आरक्षण दिलं पाहिजे. आपण आता जरांगेंचं ऐकायला पाहिजे नाहीतर ते मोर्चा घेऊन येतील आणखी काही करतील. माझी आणखी एक दुसरी कल्पना आहे. हे जे मंत्री सारखे तिकडे जात आहेत फार अडचणीचं होतंय तर आता दोन चार बंगले मंत्र्यांसाठी तिकडे उभारावेत. मुख्य सचिवांचं एक ऑफिस तिकडे तत्काळ कार्यान्वित करा. त्यांनी सांगितलं की मंत्र्यांनी ताबडतोब जीआरवर सही करावी, असा उपरोधिक टोला भुजबळांनी लगावला.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube