Download App

Dinanath Mangeshkar Hospital : ‘घटनेतील दोषींवर निश्चितपणे कारवाई …’ केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन

Minister Muralidhar Mohol On Dinanath Mangeshkar Hospital : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) पैशाअभावी उपचार न दिल्याने तनिषा भिसे नावाच्या गर्भवती महिलेचा मृत्यू झालाय. यावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी म्हटलंय की, समाजातल्या प्रत्येक स्तरातून झालेल्या घटनेचा निषेध झाला आहे. अत्यंत संवेदनशील अशी ही घटना आहे. अत्यंत दुर्दैवी घटना (Tanisha Bhise Death Case) आहे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्‍यांनी तातडीने त्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी समिती नेमली आहे. झालेला प्रकार चुकीचा आहे.

चुकीच्या झालेल्या या सगळ्या प्रकारात जे कुणी दोषी असतील, संस्था असेल, व्यक्ती असेल त्याच्यावर (Pune News) निश्चितपणे कारवाई होईल, असं आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांसोबत बोलताना दिलं आहे.

गिरीश महाजन यांचे कोणाशी संबंध? खडसे यांचा खळबळजनक आरोप

लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे जनभावना ज्या आहेत, माझ्या अन् त्या जनभावना काही वेगळ्या नाहीत. स्वाभाविकपणे झालेला प्रकार हा दुर्दैवी आहे. पुन्हा असा प्रकार होवू नये, याची देखील काळजी आणि खबरदारी झालेल्या घटनेतून आपण सर्वांनी घेतली पाहिजे. निश्चितपणे घटनेतील दोषींवर कारवाई होईल. आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत, असं देखील मोहोळ यांनी स्पष्ट केलंय.

तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात भाजपा पदाधिकारी बॉडीवर आहेत, म्हणून कारवाई होत नसल्याचं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. त्यांच्यावर बोलताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, ते खूप मोठे नेते आहेत. त्यांच्यावर बोलणं कितपत योग्य आहे, हे मला माहित नाही. परंतु संजय राऊत बोलतात म्हटल्यावर ते फार काही गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही.

संपूर्ण देश विकून झाल्यावर… वक्फची संपत्ती दिसली, संजय राऊतांनी साधला PM मोदींवर निशाणा

वक्फ कायद्यावर बोलताना मोहोळ म्हणाले की, वक्फ जमिनी ठरावीक लोकांच्या ताब्यात होत्या. या जमिनी गरिबांच्या मुलांच्या शिक्षण, सामाजिक कामासाठी असतात. त्यांचा गैरवापर सुरु होता. आता कायद्यामुळे या जमिनींचा गोरगरिब मुस्लिमांसाठी वापर होईल. यासोबतच महायुती भक्कम असून तुटणार नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय.

 

follow us