गिरीश महाजन यांचे कोणाशी संबंध? खडसे यांचा खळबळजनक आरोप

गिरीश महाजन यांचे कोणाशी संबंध? खडसे यांचा खळबळजनक आरोप

Eknath Khadse Allegations On Girish Mahajan Aaffair : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी महायुती सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केलेत. माध्यमांसोबत बोलताना खडसे (Eknath Khadse) म्हणाले की, अनिल थत्ते यांनी गिरीश महाजन यांच्या संदर्भात गंभीर आरोप केलाय. की, ते रात्री एक वाजेनंतंर एका महिला आयएस अधिकाऱ्याला त्यांनी शंभर-शंभर वेळा फोन केलेत. आता हे गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि आयएस अधिकारी यांची गोष्ट आहे, ती संपूर्ण महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे.

हे सर्वश्रूत आहे. उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. आजचं नाहीये. कित्येक वर्षापासून ही चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. ते अधिकारी कोण आहेत, हे सर्वांना श्रूत आहेत. मलाही माहित आहे. सर्वांनाच माहित (Girish Mahajan Aaffair) आहे. पण एखाद्या अधिकाऱ्याचं नाव घेणं योग्य होणार नाही, असं अनिल थत्ते सुद्धा बोलले आहेत. त्यामुळे मला वाटतं असे जे मंत्री आहेत, जे आयएएस अधिकाऱ्यांना फोन करतात, असा अनिल थत्तेंचा आरोप आहे. यात जर तथ्य असेल तर यांना मंत्रि‍पदावर राहण्याचा काय अधिकार आहे?

संपूर्ण देश विकून झाल्यावर… वक्फची संपत्ती दिसली, संजय राऊतांनी साधला PM मोदींवर निशाणा

नैतिकता आहे की नाही काहितरी? बायकांना बोलवायचं, बायकांना फोन करायचे. असे आरोप होत असतील, तर ते गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. त्या संदर्भात सगळ्यांना माहित आहे. नावं अनेकांची माहिती आहेत. त्या आयएएस अधिकाऱ्याचं नाव तर आजचं नसून गेल्या कित्येक वर्षापासून जोडलेलं आहे. गेल्या कित्येक वर्षापासून हे प्रकरण महाराष्ट्रामध्ये आहे, असा खळबळजनक आरोप एकनाथ खडसे यांनी केलाय. आता या आरोपांमुळे गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

यावेळी माध्यमांसोबत बोलताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेले वक्तव्य हा निर्लज्जपणाचा कळस आहे, असं देखील एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. त्यांनी राज्यातील शेतकर्‍यांची माफी मागून आपले वक्तव्य मागे घ्यावे, असं देखील खडसे यांनी म्हटलंय. तर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. उपचाराअभावी एखाद्या गर्भवती महिलेचा मृत्यू होणं, ही अत्यंत दुःखदायक असल्याची प्रतिक्रिया खडसे यांनी दिलीय.

पिग्मी एजंटची मुलगी झाली दिवाणी न्यायाधीश! बीडची ऋचा कुलकर्णी राज्यात पहिली

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे नावाजलेले रुग्णालय, मात्र या ठिकाणी आधी पैसे भरा मग उपचार, अशा पद्धतीचं जे समोर येत आहे. हा प्रकार माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार आहे. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी अशी देखील मागणी करावी. राज्यात अवकाळीमुळे पिकांचं नुकसान झालंय. परंतु अजून काही ठिकाणी पंचनाम्याला सुरूवात झालेली नाही. सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने त्वरीत पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, असं देखील खडसे यांनी म्हटलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube