वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन

कलाटे यांनी पुढाकार घेत वाकड भागातील मिसिंग लिंक रस्त्यांना गती देण्याचा संकल्प केला आहे.

News Photo   2026 04 15T195850.028

वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन

वाकड हिंजवडी परिसरातील नागरिकांच्या (Kalate) दैनंदिन प्रवासातील अडचणी दूर करत वाहतूक समस्येवर उपाययोजनांच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे आला आहे. उत्कर्ष चौक (दत्त मंदिर रोड) ते ब्लीस सोसायटी, ईडन टॉवर मार्गे वेदांत सोसायटी होत हायवे (अंडरपास – टीपटॉप हॉटेल) पर्यंतचा रस्ता आता अंतिम टप्प्यात असून, येत्या १० ते १२ दिवसांत नागरिकांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे.

प्रभाग क्रमांक २५ चे नगरसेवक राहुल तानाजी कलाटे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या १०० दिवसांत प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. आतापर्यंत तीन मिसिंग लिंक मार्ग राहुल कलाटे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

वाकडमधील वाहतूक प्रश्नांवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी नगरसेवक राहुल कलाटे यांनी पुढाकार घेत वाकड भागातील मिसिंग लिंक रस्त्यांना गती देण्याचा संकल्प केला आहे. याअंतर्गत यापूर्वी अतिक्रमण कारवाईनंतर दत्त मंदिर रस्त्याच्या उर्वरित कामाला गती देण्यात आली आणि त्यानंतर तातडीने हायवे कनेक्टिव्हिटीचे काम कलाटे यांनी हाती घेतले आणि उत्कर्ष चौक (दत्त मंदिर रोड) ते ब्लीस सोसायटी, ईडन टॉवर मार्गे वेदांत सोसायटी होत हायवे (अंडरपास – टीपटॉप हॉटेल) पर्यंतच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली.

भक्ती आणि भव्यतेचा संगम: कृष्णजन्मभूमी येथे;कृष्णावतारमच्या दिव्य ट्रेलरचे अनावरण!

संबंधित रस्त्याचे काम २०२२ पर्यंत काही प्रमाणात पूर्ण झाले होते. नियोजनानुसार रस्त्याची रुंदी १८ मीटर असली, तरी नागरिकांच्या सोयीचा विचार करून तातडीने ९ मीटर रुंदीचे काम सुरू करण्यात आले होते, जे आता पूर्णत्वास येत आहे. नगरसेवक राहुल कलाटे यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन रस्त्याच्या कामाची पाहणी केली. तसंच, उत्कर्ष चौकापासून दत्त मंदिर रोड तसेच ईडन आणि ब्लीस सोसायटी परिसरातील पदपथाचे उर्वरित काम तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. हे काम जलदगतीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देशही यावेळी कलाटे यांच्याकडून देण्यात आले आहेत.

हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर वाकड ते हायवे कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ होणार असून, वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक गतिमान होईल. नागरिकांचा वेळ वाचण्यासोबतच प्रवासातील त्रासही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. वाकड, ताथवडे आणि पुनावळे परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी व त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे नगरसेवक राहुल कलाटे यांनी यावेळी सांगितले.

पहिल्या १०० दिवसांत पूर्ण करणार असे दिलेल्या आश्वासनांपैकी हे एक महत्त्वाचे आश्वासन पूर्ण करण्यात आले असून, त्यादृष्टीने वाकडमधील रस्ते आणि मिसिंग लिंक प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. नागरिकांनी पार्किंग आणि वाहतूक शिस्त पाळून आमच्या प्रयत्नांना सहकार्य करावे ही नम्र विनंती असं नगरसेवक राहुल कलाटे म्हणाले आहेत.

Exit mobile version