Nashik News : करिअर गाईडन्सच्या नावाखाली धार्मिक शिक्षण, दादा भुसेंनी लक्ष घालताच गुन्हा…

Nashik News : करिअर गाईडन्सच्या नावाखाली धार्मिक शिक्षण, दादा भुसेंनी लक्ष घालताच गुन्हा…

Nashik News : नाशिकच्या मालेगावमध्ये विद्यार्थ्यांना करिअर गाईडन्सच्या नावाखाली धार्मिक शिक्षण देत असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी पालकमंत्री दादा भुसे यांनी लक्ष घालताच पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून यादरम्यान, काही काळ नाशिकमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

Ashadhi Wari : पोलिसांनी घरात कोंडून मारलं; आळंदीतील घटनेचा वारकऱ्याने सांगितला घटनाक्रम…

मालेगावमधील सत्य मलिक संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी करिअर गाईडन्सच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमादरम्यान, विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण देत असल्याचा प्रकार घडला असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आला आहे.

Meera Joshi: मराठी अभिनेत्रीचा भीषण अपघात, कारचा झाला चक्काचूर; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “गमावलं ना…”

घडलेल्या प्रकाराची माहिती हिंदुत्ववादी संघटनांना समजताच या संघटनांनी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. परंतु कुठल्याही स्वरुपाचा गुन्हा पोलिसांकडून दाखल केला नव्हता. संबंधित विद्यार्थ्यांना बोलावून त्यांच्याकडून करिअर गाईडन्सच्या कार्यक्रमात असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचा खोटा जबाब घेण्यात आला होता.

Hemangi Kavi : माझ्या पायाला गोंजारत बसले तर, मी सगळ्यांच्या डोक्यात जाईन; तिने सांगितला ‘तो’ किस्सा…

प्रकरणाची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांना मिळताच त्यांनी तातडीने लक्ष घालून पोलिसांनी चांगलेच फैलावर घेतले आहे. पोलिस प्रशासनासह मालेगावातील नागरिकांना कारण नसतानाही वातावरण खराब करण्याचं काम करु नये, असा सज्जड दम पालकमंत्री दादा भुसेंनी यावेळी भरला आहे.

औरंगजेबाचे पोस्टर झळकावल्या प्रकरणी उद्या भिंगार बंद

या प्रकरणावर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होत संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. विद्यार्थ्यांकडून खोटा जबाब घेऊन प्रकरण दाबण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून केला जात होता. मात्र, पालकमंत्र्यांनी दखल घेताच अखेर गुन्हा दाखल केला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, सत्य मलिक संस्थेच्या संबंधितांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचं पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. एकीकडे राज्यातील अहमदनगर, कोल्हापुर, जळगाव, अमरावती, जिल्ह्यात आधीच तणावाची परिस्थिती असतानाच आता नाशिकमध्येही तणावाची स्थिती निर्माण होत असल्याचं दिसून येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube