Download App

पुण्याचे बँकॉक होतेय, तुमचे नवे पालकमंत्री कुठे आहेत ? संजय राऊतांनी अजित पवारांना डिवचले !

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

Sanjay Raut On Ajit Pawar : पुण्यातील शिवसेना मेळाव्यात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कायदा व सुव्यवस्थेवरून पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पुण्याचे बँकाक होत आहे. कुठे आहेत तुमचे नवे पालकमंत्री, जुने तर गेले आहेत. गृहमंत्री कुठे आहेत ? नाही तर पुण्याला वाचविण्यासाठी शिवसेनेला रस्त्यावरून उतरून हे अड्डे उद्धवस्त करावी लागतील, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.


Gaudbangal word : गौडबंगाल म्हणजे काय? समजून घ्या | LetsUpp Marathi

महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जात आहेत. पण गुजरातमधून ड्र्ग्ज महाराष्ट्रात येत आहे. मुंद्रा बंदरात ड्र्ग्स उतरले जातात. ते ड्रग्ज पुण्यापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात आहे. हे काम गुजरातची लॉबी करत असल्याचा गंभीर आरोपही राऊत यांनी केलाय. शांतता पुणेकर वाचत आहेत. ही जाहिरात वाचली. काही तरी पुस्तकाचा मेळावा भाजपवाले भरवत आहेत. पण पुणेकरांनो शांत राहू नका. हे ड्रग्जमाफीयांचे षडयंत्र आहे. पुण्याला एक वेगळी संस्कृती आहे. पुण्यातील विमाननगर भागात विश्रांतवाडी भाग आहे. या भागातील जेष्ठ नागरिकांनी पोलिस आयुक्तांना एक निवेदन दिले आहे. पुण्याचे बँकॉक होत आहे. या बँकॉकमध्ये ड्रग्ज, वेश्याव्यवसाय असतो. कुठेयत तुमचे नवे पालकमंत्री, जुने तर गेले आहेत. गृहमंत्री कुठे आहेत. नाही तर शिवसेनेला रस्त्यावर उतरून हे अड्डे उद्धवस्त करावे लागतील, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

पत्र लिहून कुणाला वेड्यात काढताय, आम्ही काय डोक्याला गोडं तेल लावतो? अंधारेंनी घेतला फडणवीसांचा समाचार


Sanjay Raut : ‘तीन घाशीराम सरकार चालवतात, भाजपाकडे नैतिकताच नाही’; राऊतांचा हल्लाबोल

इडी, सीबीआयला आम्ही घाबरत नाही. तुम्ही आमचे काय करणार ? या पुण्यात ड्रग्ज रॅकेट चालविले जाते. त्यात शिंदे गटाचे दोन मंत्री आहेत. त्यांना ड्र्ग्ज माफीयांकडून लाखो रुपये हप्ते मिळतात, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही काय करत आहात, असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे.

राज्यात दाऊदच्या संबंधित हालचाली असल्यास त्या ठेचून काढू, असे देवेंद्र फडणवीस म्हणतात. पण इक्बाल मिर्चीशी संबंध प्रफुल्ल पटेलांचे स्वागत कोण करतंय. इक्बाल मिर्चीची संबंधित साडेचारशे कोटींची जमिनीची खरेदी प्रफुल्ल पटेल यांनी केली असा आरोप भाजपकडून करण्यात येत होता. त्या प्रफुल्ल पटेलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह कसे भेटतात, असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज