सगळ्यांना गावबंदी, पण रोहित पवारांच स्वागत; भुजबळांचा निशाणा

  • Written By: Published:
सगळ्यांना गावबंदी, पण रोहित पवारांच स्वागत; भुजबळांचा निशाणा

Chhagan Bhujbal : गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा मराठा आरक्षणसाठी लढा सुरू आहे. त्यांच्या आंदोलनाला चांगलाच प्रतिसाद मिळाला. आंदोलनाच्या पहिल्या टप्यात मराठा आंदोलकांनी चांगलाच आक्रमक झाला होता. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली होती. याच गावबंदीच्या मुद्यावरून मंत्री छगन भुजब (Chhagan Bhujbal) यांनी आमदार रोहित पवारांसह (Rohit Pawar) गावबंदी करणाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र केलं. सगळ्यांना गावबंदी आहे, मात्र, एकाच पक्षाच्या नेत्यांना गावबंदी नाही, असं भुजबळ म्हणाले.

Gaudbangal word : गौडबंगाल म्हणजे काय? समजून घ्या | LetsUpp Marathi 

आज ओबीसी समाजाचा मेळावा इंदापूरमध्ये झाला. या सभेत बोलतांना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेचा चांगलाच समाचार घेतला. हा मला काय म्हणतो येवल्याचं येडपट, म्हणजे मी… आता बघा त्याचा जन्म 1985 मध्ये झाला होता का? मला माहीत नाही, पण, त्यावेळी मी मुंबईचा महापौर आणि आमदार दोन्ही झालो. एक नाही तर दोन पोस्ट भुषवल्या. देशाच्या महापौरांचाही मी अध्यक्ष झालो. अरे, तु ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखव. याच्या डोक्यात हवा गेली. लोकांनी याला उगाच महत्वं दिलं. मनोज जरांगे अकलेने दिव्यांग झाला, अशी एकेरी टीका भुजबळांनी केली.

महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन काँग्रेस पुन्हा आक्रमक; विधानभवनावर धडकणार ‘हल्लाबोल’ मोर्चा 

यावेळी गावबंदीवरही भुजबळांनी भाष्य केलं. सध्या चाललंय काय आहे? गावबंदी. काय गावबंदी ? मी कुठेही गेलो ना की, गावबंदी. घनसावंगी गावात गेलो तिथे दोन फ्लेक्स होते. एक मराठा आरक्षणाचाा. गावबंदी आहे. कुणीही यायचं नाही. त्याच्या पुढेच दुसरा प्लेक्स होता रोहित पवारांच्या स्वागताचा… आमदार रोहित पवार आणि त्यांच्या यात्रेचं स्वागत. बाकीच्यांना गावबंदी, यांचं स्वागत. त्यानंतर ते गावात गेले. भाषण झालं. एका मुलाने गावबंदीवर प्रश्न विचालले, त्याला खाली बसवलं. दुसऱ्या दिवशी तो पोरगा हॉस्पिटलमध्ये होता कारण त्याला मारहाण झाली, छगन भुजबळ म्हणाले.

भुजबळ म्हणाले, मी मागेही पोलिसांना सांगितलं की, गावबंदीचे फलक काढून टाका. राज्यघटनेनुसार कोणतीही व्यक्ती कोणत्याही गावात जाऊ शकते. भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला देशात कुठेही जाण्याचा अधिकार दिला आहे. बोलण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य दिले आहे. यामुळे कोणालाही गावबंदी करता येत नाही. गावबंदी केली तर एक महिन्याच्या शिक्षेची तरतूद आहे. मात्र, गावबंदीचे फलक काढण्यात आले नाहीत.

भुजबळ म्हणाले की, सगळ्यांच्या संयमाला मर्यादा असतात. संयम संपला तर त्यांच्या क्रोधाला कुणी आवर घालू शकणार नाही…. त्यामुळं सरकारने यात लवकरात लवकर लक्ष घालावं, असं ते म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube