Darshana Pawar Murder Case : एमपीएससीमध्ये राज्यात तिसरा क्रमांक मिळविणाऱ्या दर्शना दत्तू पवार (Darshana Pawar) हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला आहे. पुण्यात सत्कार स्वीकारल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून ती बेपत्ता होती. तिचा मित्रही बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. (MPSC topper Darshana Pawar murder case: Shocking revelations from postmortem report)
दर्शना ही मूळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची आहे. ती पुण्यात स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत होती. यंदाच्या एमपीएससीच्या निकालामध्ये तिचा तिसऱ्या क्रमांक आला होता. वन अधिकारी म्हणून तिला पोस्ट मिळाली होती. दर्शना दत्तू पवार हिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला होता. याबाबतचा अहवाल आता पोलिसांना प्राप्त झाला असून यात धक्कादायक खुलासे झाले आहेत.
मंत्रिपद असतानाही विखेंचा थोरातांकडून ‘गणेश’मध्ये करेक्ट कार्यक्रम !
दर्शना पवार हिच्या डोक्यावर आणि शरीरावर अनेक जखमा आढळल्या असून यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचे अहवालामध्ये नमुद करण्यात आले आहे. यामुळे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. प्रथमदर्शनी संशयाची सुई दर्शनाचा मित्र राहुल हांडोरे याच्यावर असून तो सध्या बेपत्ता आहे. त्याच्या शोधासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी 5 पथकं तयार केली आहेत.
हिंदूंना धोका असेल तर मोदींना राज्य करण्याचा अधिकार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
दर्शनासोबत ट्रेकिंगसाठी गेलेला तिचा मित्र राहुल हांडोरेवर तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांच्या हाती आलेल्या CCTV फुटेजवरू हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राहुल गडावरून एकटाच खाली येत असल्याचे समोर आले असून, पोलिसांकडून राहुलचा कसुन शोध घेतला जात आहे. त्याच्या मोबाईलचं लोकेशन बाहेरील राज्यात दिसत आहे.