Download App

Video: विरोधकांना राजकारण कशाचं कराव याचं भान नाही; मेट्रो उद्घाटनावरून मोहळांचा विरोधकांवर वार

पुणे मेट्रो उद्घाटनाचा कार्यक्रम काल रद्द करण्यात आला. पावसाचं कारण देऊन हा रद्द झाला. मात्र त्यावरून चांगलाच राजकारण तापलं आहे.

  • Written By: Last Updated:

Muralidhar Mohol on Pune Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते (29 सप्टेंबर) रोजी ऑनलाईन पद्धतीने मेट्रो उद्घाटन व विविध विकास कामांचा उद्घाटन व भूमिपूजन होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थितीत राहणार आहेत. गणेश कला क्रीडा मैदान येथे हा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

विरोधकांनी काय केलं?

पाऊस असल्याने कार्यक्रम रद्द केला. कार्यक्रम झाला असता तर वाहतूक प्रश्न वाढला असता, नागरिकांना त्रास झाला असता, नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी म्हणून कार्यक्रम रद्द केला असंही ते यावेळी म्हणाले. पुण्यात नवीन मेट्रो मार्गाला परवानगी मिळेल, मेट्रो जाळ वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे असं म्हणत राजकारण कशाच करावं हे विरोधकांना कळत नाही. त्यांच्या काळात विरोधकांनी काय केलं? असा प्रश्न उपस्थित करत पुणेकरांना सगळ समजत असही मोहळ यावेळी म्हणाले आहेत.

दुःखद बातमी : खान्देशातील काँग्रेसचा आवाज हरपला; ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचे निधन

प्रत्येक टप्प्याला मोदी का असा प्रश्न विचारला जातोय. पण असंच मेट्रो जगात सुरू होते. निवडणुकीत काय होत हे लोकसभेला लोकांनी दाखवले आहे. किती तरी नेते कोरोना काळात दिसले नाहीत, पुणे मेट्रोला विरोध करणारे आता मेट्रो उद्घाटन करत आहेत असंही ते यावेळी म्हणाले. तसंच, सरकारी कार्यक्रम आहे. सुरक्षा महत्वाची आहे. खर्च होतो आणि झाला आहे. परंतु, निसर्गाबद्दल कुणाच्या काही हातात नाही. पावसाची शक्यता नसती तर कार्यक्रम झाला असता असंही मोहळ म्हणाले.

पावसामुळे रद्द

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल मेट्रोच्या स्वारगेट ते मंडई या भुयारी मार्गाचे लोकार्पण होणार होतं. पंतप्रधान दुपारी ४ वाजता विमानतळावरून शिवाजीनगर मेट्रो स्थानकातून मेट्रोने स्वारगेटला जाणार होते. त्यानंतर ही मेट्रो प्रवाशांसाठी सुरु होणार होती. पावसामुळे पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नागरिकांना उदघाटन समारंभाला येणं शक्य होणार नाही. त्यामुळे उदघाटन समारंभ रद्द करण्यात आला.

follow us